।। मोठी बातमी अपडेट कोरोना च्या महामारित बँकाच्या वेळेतही झालेत बदल!
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 23 एप्रिल 2021.
कोरोना चा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन, आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे मृत्यूंची आकडेवारी लक्षात घेऊन, महाराष्ट्रात बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहेत. आता राष्ट्रीयकृत बँका सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत, म्हणजे दररोज फक्त 4 तास बँकिंग सुविधा देतील . तर या याकाळात फक्त चार प्रकारच्या सेवा दिल्या जातील – यामध्ये रोकड जमा करणे, रोख रक्कम काढणे, धनादेशांचे क्लिअरिंग, पैसे पाठविणे आणि सरकारी व्यवहारचा समावेश आहे. दरम्यान बँका संध्याकाळी चार वाजता बंद होतील . आवश्यक असल्यास, हा आदेश पुढेही सुरू ठेवला जाईल – असेही यामध्ये समितीचे वतीने सांगण्यात आले आहे . राज्यस्तरीय बँकर्स समिती समन्वयक ब्रिजेश कुमार , यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे – तर हे नवे बदल आज 23 एप्रिल पासून , ते 15 मेपर्यंत लागू असतील . बँकाच्या वेळेत बदल होत आहेत हि माहिती सर्व सामान्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे . याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.