साकोळच्या अश्विनी या बौद्ध तरूणीचा लातुरात खून!
मुंबई प्रतिनिधी –
लातूर येथिल एका खाजगी रुग्णालयात काम करुन एल. एल. बी. चे शिक्षण घेणाऱ्या बौद्ध तरुणीचा खून झाल्याचे समोर आले असुन तीच्या सोबत रुग्णालयात काम करणाऱ्या एका तरुणास अटक करण्यात आली असून एक तर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याचे सांगितले जात आहे.
साकोळ ता. शिरूर अनंदपाळ येथील 24 वर्षीय अश्विनी आपले डि. एम. एल. टी चे शिक्षण पुर्ण करुन लातुर येथील कवठाळे या खाजगी हॉस्पिटलमध्ये लँब टेक्नीशयन म्हणुन काम करीत होती. याच बरोबर ती दयानंद महाविद्यालयात एल. एल. बी. चे शिक्षण घेत होती. मात्र कवठाळे रुग्णालयात काम करणारा किरण नेलकळे हा बदमाश, नालायक तरुण तीला सारखा शाररीक व माणसिक त्रास देऊन , लग्नाची वारंवार मागणी करीत होता. त्याच्या एकतर्फी प्रेमामुळे अश्विनी खचली होती. तिने लातुर सोडून थेट गाव गाठले होते. ती घटनेच्या चार दिवसापुर्वी लातुरात आपल्या मैत्रिणी सोबत राहत होती. मात्र दि. 1 मार्च रोजी महादेव कांबळे रा. साकोळ यांना दुपारी 3.30 च्या सुमारास फोन करुन किरण पुन्हा त्रास देत असल्याचे सांगितले त्यांनी किरणचा नंबर घेवून बोलले. अश्विनीला त्रास न देण्याचा दम दिला आणि अश्विनीस उद्या म्हणजे 2 मार्च रोजी सकाळी नऊ च्या गाडीने साकोळला येण्यास सांगितले होते. मात्र दुसऱ्या दिवसी तीचा मृतदेह एमआयटी कॉलेजच्या पाठिमागे रेल्वे लाईनवर सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत अश्विनीच्या वडीलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणी अरोपी किरण यास अटक करण्यात आली.
पीडित तरुणीचा खून झाला असून यातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत. सर्व आरोपीना फाशी झालीच पाहिजे.
“”ती त्याला म्हणत होती त्रास देऊ नको मला शिकायचंय. “”त्याने तिला हळहळ करून मारून टाकलं. महाराष्ट्रात दलित मुली सुरक्षित नाहीत. आरोपीना फाशी झालीच पाहिजे! याप्रकरणी पोलिसांनी आणि शासनाने गंभीरपणे लक्ष वेधून योग्य न्याय द्यावा. अशी मागणी केली होत आहे.
चक्रधर मेश्राम