महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा रुग्णालयात पुन्हा दुसरी घटना कोविड केंद्राच्या ऑक्सीजन सिलेंडर मधील लिकेजमूळे स्फोट

Summary

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्राला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या सेंट्रल लाईन मधील लिकेजमुळे स्फोट झाला . ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली . भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड ब्लॉक आहे . सध्या रुग्णांची वाढती संख्या बघता […]

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्राला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या सेंट्रल लाईन मधील लिकेजमुळे स्फोट झाला . ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली . भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड ब्लॉक आहे . सध्या रुग्णांची वाढती संख्या बघता जिल्हा सामान्य रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नेत्र विभागात नव्याने कोविंड युनिट सुरू करण्यात आले आहे . हे युनिट आज शुक्रवारलाच सुरू झाले . या युनिटमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा यासाठी ऑक्सिजनची सेंट्रल लाईन तयार केली आहे . ही सेंट्रल लाईन अचानक लिकेज झाली . यामुळे तिथे स्फोट झाला . स्फोटाचा आवाज येताच कोविड केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग तातडीने विझविली . दरम्यान , या केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना तातडीने इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविले . यामुळे मोठी दुर्घटना टळली . कोबी केंद्र मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्व उपचार घेणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केली असून सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.याच्या पुर्वी शाॅक सर्किटमुळे दहा अज्ञात बालकांचा मृत्यू झाला होता व त्यामध्ये तीथले जिल्हा शल्य चिकित्सक व नर्सेस निलंबित झाल्या होत्या.आता पण हि घटना झाल्याने आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *