नगर परिषद कामगारांचे कामबंद आंदोलन. प्रशासनासह कंत्राटदारांचे दुर्लक्ष??

गडचिरोली प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १४ एप्रिल २०२१ .
मासिक वेतन बॅक खात्यात जमा करण्यात यावे. या मागणीसाठी नगर परिषद अंतर्गत काम करणाऱ्या ७० कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन शुक्रवार पासून सुरू केले आहे. या आंदोलनात सर्व कामगार सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा पाचव्या दिवशी पर्यंत प्रशासकीय यंत्रणा आणि कंत्राटदार हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून कामगारांवर अन्याय करीत आहे. असा आरोप कामगारांनी केला आहे.
शासनाच्या नियमानुसार आरमोरी नगरपरिषद घनकचरा, साफसफाई, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ५०७ रुपये मजूरी निर्देशित असतांनाही केवळ २३० रु. दैनिक मजूरी देऊन कंत्राटदार आणि प्रशासन आर्थिक लुट करून कामगारांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप ही कामगारांनी केला आहे. कोविड -१९ च्या महामारित जिवाची पर्वा न करता या कामगारांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. कोविड -१९ मध्ये मृत्यू झालेल्यांचे अंतिम संस्कार ही केले. या काळात कामगारांना मा. जिल्हाधिकारी यांनी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे .संबंधित कंत्राटदार हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असून कामगारांना कामावरून बंद केल्याने उपासमारीची पाळी आली आहे.. शासकीय नियमानुसार कामगारांना मोबदला देण्यात यावा. या मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी, अशोक सांडेकर , तहसीलदार आरमोरी. आदींना निवेदन दिले आहे.