महाराष्ट्र

डोंबिवलीत क्षुल्लक वादातून तरूणाचा खून तर 2 जण जबर जखमी.. डोंबिवली पोलिसांनी पाचही आरोपीच्या मुसक्या आवळल्या….

Summary

डोंबिवली : पाच महिन्यांपूर्वी केलेल्या शिवीगाळीचा वाद उफाळून आल्यानंतर झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जायबंदी झाले. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये गुरूवार-शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच […]


डोंबिवली : पाच महिन्यांपूर्वी केलेल्या शिवीगाळीचा वाद उफाळून आल्यानंतर झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जायबंदी झाले. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये गुरूवार-शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच पोलिसांनी 12 तासांच्या आत पाचही आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत…..महेश दिलीप गुंजाळ (22), निखिल सुरेश माने (23), जयेश अशोक जुवळे (22), आशिष अनिल वाल्मिकी (22) आणि श्रीनिवास बसप्पा सुगाला (23) अशी अटक केलेल्या खुन्यांची नावे असून हे सर्व मारेकरी दत्तनगर परिसरात राहणारे आहेत. तर या पाच जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शिवाजी वामन खंडागळे (25) हा ठार झाला, तर संतोष विलास लष्करे (34) हा जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
       या संदर्भात राजू शिवराम धोत्रे (29) याच्या जबानीवरून रामनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संतोष लष्कर याच्या मुलीचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला मेहुणा राजू धोत्रे आणि त्याचा मित्र शिवाजी खंडागळे हे दत्तनगरमध्ये राहणारा संतोष लष्कर याच्या घरी गेले. तेथे ओली पार्टीही झाली. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे यांच्यात गप्पा सुरू होत्या. संतोष लष्कर याने मेहुणा राजू धोत्रे याला पाच महीन्यापूर्वी महेश गुंजाळ याने आपणास शिवीगाळ केल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या राजू धोत्रे याने महेश गुंजाळला फोन करून माझ्या भावोजीला जाब विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे विनाहत्यार हे तिघे चालत महेश केणे याच्या प्रगती कॉलेजमागच्या कार्यालयाजवळ राहणाऱ्या महेश गुंजाळ याला जाब विचारण्यासाठी गेले. तेथे खडाजंगी सुरू झाली. तू मला आता फोनवर शिवीगाळ का केली ? असा महेश गुंजाळला जाब विचारला. वातावरण तापल्यानंतर आधीच हत्यारांसह तयारीत असलेल्या महेश गुंजाळ व निखील माने या दोघांनी त्यांच्याकडील लोखंडी रॉडने, जयेश जुवळे व अण्या उर्फ श्रीनिवास सुगाला यांनी त्यांच्याकडील स्टंपने, तर आशिष वाल्मीकी याने त्याच्या हातातील तलवारीने राजू धोत्रे आणि त्याचा भावोजी संतोष लष्कर यांच्या डोके, पाठ, पायावर हल्ला चढवला. तर राजूचा मित्र शिवाजी खंडागळे याच्यावर महेश गुंजाळ व निखील माने या दोघांनी मिळून डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात घाव वर्मी बसल्यामुळे शिवाजी खंडागळे हा जागीच ठार झाला. त्यानंतर पाचही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या राजू धोत्रे व त्याचा भावोजी संतोष लष्कर या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ठार झालेल्या शिवाजी खंडागळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कल्याणच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. तर दुसरीकडे या हल्ल्यातील जखमी राजू धोत्रे याच्या जबानीवरून महेश गुंजाळ, निखील माने, जयेश जुवळे, अण्या सुगाळा, आशिश वाल्मीकी या हल्लेखोरांच्या विरोधात भादंवि कलम 302, 324, 323, 504, 506, 141, 143, 147, 148, 149 प्रमाणे शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल केला. वपोनि सुरेश आहेर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोजसिंग चौहाण, हवा. शिंदे, जाधव, वाघ, किर्दत्त, खिलारे, पिचड, तोडकर, जाधव या पथकाने गुन्हा घडल्यापासून अवघ्या 12 तासांतच फरार हल्लेखोरांच्या मुसक्या बांधल्या. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे अद्याप हाती लागली नाहीत. शनिवारी सर्व आरोपींना कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वपोनि सुरेश आहेर यांनी सांगितले.जगदीश जावळे विभागीय प्रतिनिधी डोंबिवली शहर जिल्हा ठाणे तालुका कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *