महाराष्ट्र

चॉकलेटचे आमिष दाखवून, तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न

Summary

चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमा विरोधात पोक्‍सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्‍यातील एका गावात मंगळवारी (ता. 2) दुपारी घडली. या प्रकरणी सुखदेव […]

चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमा विरोधात पोक्‍सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्‍यातील एका गावात मंगळवारी (ता. 2) दुपारी घडली. या प्रकरणी सुखदेव भोंगे (वय 49) या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पंढरपूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींबाबत वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे तालुक्‍यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संशयित आरोपी सुखदेव भोंगे (वय 49) हा मंगळवारी दुपारी आपल्या घरी एकटाच होतात्याने बाजूच्या अल्पवयीन तीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले.

घरात आणि आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून त्याने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, त्यातील एका मुलीने वासनांध झालेल्या नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत ही घटना आपल्या घरी जाऊन सांगितली.

त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी नराधमाच्या घराकडे धाव घेऊन इतर मुलींची मोठ्या शिताफीने नराधमाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी संशयित आरोपी सुखदेव बोंगेच्या विरोधात पोक्‍सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर तालुक्‍यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्‍याच्या ग्रामीण भागात सध्या अनेक अवैध धंदे खुलेआमपणे सुरू आहेत. अशा अवैध धंद्यांमुळे अनेक गावांतील महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अलीकडेच तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका महिलेने अशाच एका नराधमाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *