BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

▪बळीराजचा बळी घेऊ नका▪बळीराजा जगला तरच जग ▪टिकनार आहे. ▪बळीराजा उठाव केल्या ▪शिवाय राहणार नाही. ▪संजय भाऊ राठोड यांचा ▪केंद्रसरकरला इशारा.

Summary

♦️पोलीस योद्धा वृत्त सेवा♦️ केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोर- नां मूळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी यावर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला खतांच्या किमतीत तब्बल 60% टक्क्यांनी दरवाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. […]

♦️पोलीस योद्धा वृत्त सेवा♦️

केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोर-
नां मूळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा
संकटात सापडला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी यावर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला
खतांच्या किमतीत तब्बल 60%
टक्क्यांनी दरवाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
आधीच संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना खत दरवाढ करून मरणाच्या खाईत
ढकलू नका ,असे आवाहन करतानाच आ. संजय भाऊ
राठोड यांनी केंद्रीय कृषिमंत्री
नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र
पाठवून ही दरवाढ मागे घेण्या-
ची मागणी केली आहे.
गेल्यादीड वर्षा पासून
सर्वत्र कोरोना संकटाचे थैमान
सुरु आहे. या काळात कोरोना
संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने
ताळेबंदीस सारख्या उपाययोजना कराव्या लागल्याने ,अनेक उद्योग
धंदे ,व्यवसाय ठप्प आहेत.
एकमात्र शेती व्यवसायावर
जगाची मदार असल्याचे या काळात दिसले.

सम्पूर्ण जग थांबले असतांना शेतकरी बांधव मात्र जगाला जगविण्यासाठी अहोरात्र राबत आहेत. त्यामुळेच या नैसर्गिक आपत्ती त कुठेही धान्य, भाजी फळे,दूध या जीवनावश्यक वस्तू
चा तुटवडा पडला नाही . अशा संकट प्रसंगी शासनाने शेतकऱ्यावर आर्थिक संकट लादलेले आहे. अशी टीका
संजय राठोड यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या
एन बी एस धोरणानुसार युरिया
खत वगळता इतर रासायनिक
खतांचे दर ठरविण्याचा अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक
कंपन्यांसाठी आहे . त्याचाच फायदा घेत कच्चा मालासह इंधन
किंमतीत वाढ झाली. असा दाखला देत इफको , आय पी एल ,महाधन, जी एस फ सी
(सरदार ) आदी कंपन्यांनी डी ए पी , एम ओ पी ,व संयुक्त खताच्या किंमती त वाढ केली आहे. ही दरवाढ करतांना कुठेही ‘
एम एस पी ( मिनिमम सपोर्ट प्राईस ) चा विचार झालेला दिसत नाही. गतवर्षीच्या दरात यावर्षी
अचानकपणे 20 ते 60 दरवाढ केल्याने शेतकऱ्याचे आर्थिक बजेट कोलंडणार आहे.
या दरात विविध
खतानुसार , प्रति बॅग मागे 100
रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत
वाढ करण्यात आली आहे.
रासायनिक खतांच्या दरवाढी करतांना शेतकऱ्याची हलाखीची
स्थिती , कोरोना संसर्गाचे सावट
, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ
या सारखी नैसर्गिक आपत्ती,
टाळे बंदीने बाजारपेठ बंद
असल्यामुळे उत्पादित मालास
उठाव नसल्याने शेतकऱ्याचे होत असलेले नुकसान या सर्व गोष्टी चा कुठे ही विचार झालेला नसल्याने या दरवाढीने शेतकरी
शेतीपासूनच परावृत्त होण्याची भीती संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केली . ही दरवाढ करतांना शेतकऱ्याच्या परिस्थिती चा विचार होणे गरजेचे होते. आजच्या घडीला शेती हा सर्वाधिक बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. बोगस बियाणे , सिंचनाच्या असुविधा , निसर्गाचा
लहरीपणा यामुळे शेतीत उत्पन्नाची हमी नाही.शिवाय
उत्पादित माल हमी दराने घेणारी यंत्रणा प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याने सर्व स्तरातून शेतकऱ्यांची कोंडी सुरू आहे.
शेतीस लावलेला खर्च ही निघत नाही. या सर्व बाबींचा संवेदनशील
तेने विचार केल्यास रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दरवाढ
ही अन्यायकारक असल्याचे लक्षात येईल .असे संजय भाऊ राठोड यांनी केंद्रीय कृषिमंत्री
तोमर यांच्या लक्षात आणून दिले.
शिवाय ,नवीन उत्पादीत
रासायनिक खतांची दरवाढ झाल्याने विक्रेत्यांकडे स्टॉक मध्ये असलेले जुने खतही नवीन दराने
शेतकऱ्यांना विकून त्याची फसवणूक होण्याची शक्यताही
राठोड यांनी या पत्रात व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या परिस्थिती चा
संवेदनशीलतेने विचार करून दर
वाढीच्या निर्णयाचा गांभीर्याने
पुनर्विचार करावा तसेच रासायनिक खतांच्या किंमती
कमी करून जुने दर जैसे थे
ठेवावे , अशी मागणी संजय भाऊ
राठोडं यांनी कृषी मंत्री तोमर यांचे कडे केली.
शेतकरी जगला तरच जग टिकणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ते नाकारून केंद्र सरकार रासायनिक खत कँपन्यांच्या फायद्यासाठी बळीराजा चा बळी
देत असेल तर, शेतकरी उठाव
केल्याशिवाय राहणार नाही, असा
इशाराही संजय भाऊ राठोड यांनी
या पत्रातून केंद्र सरकार ला दिला
आहे.

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪
▪महेश देवशोध ( राठोड )▪
▪वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
▪7378703472▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *