गडचिरोली जिल्ह्यात 490 कोरोनामुक्त 11 मृत्यूसह 372 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी
दि.11: – आज जिल्हयात 372 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 490 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 11 नवीन मृत्यूमध्ये ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 30 वर्षीय पुरुष, ता.अर्जुनी जि. गोंदिया येथील 53 वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील नवजात मुलगी, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय पुरुष, ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 46 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 372 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 93, अहेरी तालुक्यातील 50, आरमोरी 41, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 52, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 18, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 34, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 26 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 490 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 188, अहेरी 32, आरमोरी 35, भामरागड 21, चामोर्शी 45, धानोरा 19, एटापल्ली 12, मुलचेरा 13, सिरोंचा 45, कोरची 12, कुरखेडा 26 तसेच वडसा येथील 42 जणांचा समावेश आहे.