महाराष्ट्र हेडलाइन

*कोरोना संकट काळात 2021-22 च्या बजेट अधिवेशनात दुर्बल घटकांना मिळालं तरी काय?इ.झेड .खोब्रागडे.

Summary

मुंबई /प्रतिनिधी – चक्रधर मेश्राम यावर्षीचे बजेट अधिवेशन दि 01 मार्च 2021ला सुरू झाले.दि 8 मार्च 2021 ला, जागतिक महिला दिनी ,महाराष्ट्र राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प 2021-22 , माननीय अर्थमंत्री यांनी सादर केला. योजनावरील खर्चाचे बजेट 1,30,000 कोटींचे आहे. अर्थातच महसूल […]

मुंबई /प्रतिनिधी – चक्रधर मेश्राम
यावर्षीचे बजेट अधिवेशन दि 01 मार्च 2021ला सुरू झाले.दि 8 मार्च 2021 ला, जागतिक महिला दिनी ,महाराष्ट्र राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प 2021-22 , माननीय अर्थमंत्री यांनी सादर केला. योजनावरील खर्चाचे बजेट 1,30,000 कोटींचे आहे. अर्थातच महसूल किती जमा होणार यावर बऱ्याचशा बाबी अवलंबून राहणार आहेत. बजेट म्हणजे जमा -खर्चाचे अंदाज पत्रक आहे. या बजेट मध्ये महिला सक्षमीकरण साठी महिला दिनाची गिफ्ट आहे . कोविड-19 चे संकट वर्षभऱ्यापासून आजही आहे. तेव्हा, आरोग्यावर बजेट आणि निर्णय स्वागतार्ह आहेत. यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील अनेक निर्णय घेण्यात शासनाने फार मोठे चुकीचे घेऊन अन्याय केला आहे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वर्षे पासून सुरू आहे. अनुसूचित जातीच्या विकासाचे दृष्टीने बजेट कडे पाहिले तर लक्षात येईल की, 1,30,000 कोटी चे योजनावरील खर्चाचे बजेट नुसार, अनु जातीच्या लोकसंख्येचे प्रमाणानुसार (11.8%) बजेट मध्ये 15340 कोटींची तरतूद अपेक्षित आहे. मात्र, 10635 कोटींची तरतूद केली आहे. 4705कोटी तरतूद शासनाने कमी केली आहे.( अनुसूचित जाती उप योजना म्हणजेच विशेष घटक योजना.)अनुसूचित जमाती चे संदर्भात बजेट मध्ये तरतूद 12155 कोटी पाहिजे होती ,(9.35% लोकसंख्येनुसार.).मात्र तरतूद केली 9768 कोटी,शासनाने मात्र 2417 कोटी रुपये नाकारले असल्याचे दिसून येते. (आदिवासी उपयोजना- tsp). ओबीसी साठी 3210 कोटी , (मागील वर्षी 3000कोटी )आणि अल्पसंख्याक साठी 590 कोटींची तरतूद आहे. ( मागील वर्षी 500 कोटी होती). ही तरतूद,रुपये 1,30,000 कोटी योजना बजेट खर्चाच्या च्या तुलनेत आणि लोकसंख्या विचारात घेता नगण्य आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, मुद्धा महत्वाचा हा आहे की , केलेली तरतूद प्रत्यक्षात उपलब्ध केली जाईल का ??आणि योग्य प्रकारे, गरजेच्या आणि महत्वाच्या योजनांवर खर्च केली जाईल का?. असा प्रश्न इ. झेड.खोब्रागडे यांनी बजेट संदर्भात उपस्थित केला आहे.याविषयी सातत्याने अनेक प्रश्न मांडण्यात आले होते. मागील सरकारच्या काळात 14198 कोटी रुपये (2014-15-2018-19) अखर्चित राहिले आणि Lapse झाले. 2014-15 पूर्वीचे 7005 कोटी आणि 2019-20 आणि 2020-21 चा धरून 10,000 कोटी असे एकूण अंदाजे 30,000 + कोटी निधी नाकारण्यात आला आहे. सरकारी धोरणानुसार SCSP चे बजेट LAPSE होत नाही .किंवा वळते केले जाऊ शकत नाही. तरीपण दरवर्षी हेच घडत आले आहे. शासनाकडून असे चुकीचे का केले जाते.याबाबत यापूर्वी शासनाच्या दरबारी सविस्तर माहिती दिली आहे. तरीही शासनाने निलऀजपणाची आणि चुकीचे, अन्यायकारक धोरण अवलंबिले आहे. असे प्रतिपादन इ. झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे. 2020-21मध्ये 9668 कोटींची तरतूद SCSP मध्ये केली होती. कोरोना संकट लक्षात घेता, प्रत्यक्षात किती निधी देण्यात आला आणि सामाजिक न्याय विभागाने कोणत्या योजनांवर किती खर्च केला ह्याची माहिती करून घ्यावी लागेल. SCSP -TSP च्या प्रभावी नियोजन , बजेटिंग, योजना, अमलबजावणी, मूल्यमापन, जबाबदारी इत्यादीसाठी कायदा करण्याची घोषणा बजेट भाषणात केली जाईल असे वाटले होते परंतू यात शासनाला अपयश आले. पुढे होईल अशी अपेक्षा आहे, शासनाने त्यावर विचार करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.अशी मागणी सातत्याने केली आहे. तसेच मा. सोनिया गांधी CHAIRPERSON , काँग्रेस PARLIAMENTARY पार्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना 14 डिसेंबर2020 ला याविषयी पत्र लिहून “सामाजिक न्याय ” या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. असे पत्र आले तेव्हा, काँग्रेस चे नेते आणि मंत्री बोलायला लागले होते. मात्र या बजेट मध्ये घोषणा नाही तेव्हा का नाही असे विचारणार का?हा प्रश्न उपस्थित होतो. राज्य SCST आयोगाची पुनर्रचना होऊन, आदिवासी साठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती ची घोषणा होईल असे वाटले होते. आयोगाला अधिकार देणारा कायदा सुद्धा तात्काळ झाला पाहिजे..यासाठी जनता आशावादी आहे. परदेश शिष्यवृत्ती ची संख्या 200 + दोनशे हुन अधिक करण्याची मागणी आम्ही केली होती. भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती चे एप्रिल 2018 चे धोरण राज्याने अजून लागू केले नाही. त्यामुळे DEEMED व खाजगी UNIVERSITIES मध्ये शिकणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि फी माफी योजनेचा लाभ मिळत नाही. राज्याबाहेर शिकणाऱ्यांना फी माफी योजना लागू केली नाही ,आणि अन्य लाभही मिळत नाही. प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी वसतिगृहाची व निवासी शाळेची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. जिल्यातील प्रत्येक निवासी शाळेचा 6 वी पासून हा अभ्यासक्रम CBSE चा असेल अशी घोषणा झाली आहे. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित प्रत्येक विषयांचे शिक्षक उपलब्ध करावे लागतील. शिक्षणाचा दर्जा ? स्वाधार योजनेत सुधारणा आवश्यक आहेत. स्वाभिमान योजना बाबत काहीही केलेले दिसत नाही. सध्या स्थितीत ही योजना व्हेंटिलेटर असल्यासारखी आहे. असा आरोपही इ. झेड खोब्रागडे यांनी केला आहे. रमाई घरकुलसाठी 6829 कोटींची भरीव निधीची तरतूद दिसते. ही महत्वाची योजना आहे परंतु शासनाने दुर्लक्षित केली आहे. आरक्षणाची रिक्त पदे 81000 भर्ती ची मोहीम बाबत चर्चा नाही. या बाबतीत शासनाने झोपेत राहण्यापेक्षा तात्काळ पाऊल उचलावे. आरक्षण हा विषय सामाजिक प्रतिनिधित्वाचा कमी आणि राजकीय सोयीचा झाला असल्याचे दिसून येत आहे. बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी भर्ती आक्षण नाकारणारी ठरली आहे. याबाबत शासन गप्प बसले आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून सहकार्य केले आहे तरीही शासनाने योग्य पाऊल उचलले नाही. जातीय अत्याचार थांबविणे साठी “अत्याचार मुक्त महाराष्ट्र” हे अभियान आघाडी सरकारने 17 फेब्रुवारी 2010 ला VISION DOCUMENT मान्य केले होते. तेव्हापासून काहीच केले नाही. राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना झाली नाही, अशा बऱ्याच गोष्टी शासनाने करावयाच्या आहेत. योजना खूप, निधीही भरपूर तरी लाभार्थी नाराज. ?? सरकारने श्वेत पत्रिका काढावी, समिती नेमून शोध घ्यावा आणि गरजेच्या योजना ठेवाव्यात, काही सुधारणा तर काही बंद कराव्यात . रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन , आर्थिक विकास , युवक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे ..काही तरतुदी भाषणात HIGHLIGHT झाल्या नसल्या तरी कमी अधिक प्रमाणात असणार आहेत. सामाजिक न्यायाचे बजेट योजनानिहाय असते.सामाजिक न्याय विभागाने योजनानिहाय आकडेवारी वेबसाईटवर टाकावी.
बजेट नुसार, बार्टी ला 150 कोटी मिळणार. बार्टी ला 2009 मध्ये स्वायत्तता मिळाली. अधिकचा निधी मिळायला लागला आणि तश्या समस्याही वाढायला लागल्या .एक दशक झाले.निधीचा गैरवापर आणि गडबड साठी बार्टी ची चर्चा होते. जवळपास 1200- लोक बार्टीत काम करतात. हे आउटसोर्सिंग कंत्राटी आहेत. मनमानी कारभार झाला की असेच होणार.??सामाजिक न्याय विभागामार्फत, 125 व्या जयंतीचे कार्यक्रम , समता प्रतिष्ठान चे उपक्रम , संविधान दिन यातील गैर व्यवहार ची चर्चाच अधिक. ज्यांच्यासाठी योजना व कार्यक्रम सुरू केलेत त्यांना वेळेवर निधी मिळत नाही, यात शासन अपयशी ठरले आहे. स्वार्थ साधलेले मूठभर वगळता, कोणीच चांगलं का म्हणत नाही ह्याचेवर चिंतन होण्याची गरज आहे.संविधान फाऊंडेशन ने हे सर्व मुद्धे दि 15 मार्च 2020 च्या बैठकीत मा. मुख्यमंत्री ठाकरे यांचेसमोर मांडलेत. याविषयी इ. झेड खोब्रागडे यांनी अनेकदा पोस्ट्स लिहुन सुधारणा आणि जागृती केली आहे. 125 व्या जयंती कार्यक्रमावरील खर्चाची चौकशी 2016 पासून पडून आहे. समता प्रतिष्ठान मधील कार्यवाही थातुरमातुर होत आहे, खरे दोषी शोधून त्यांचेवर कठोर शिक्षा होईल तेव्हाच शासनाचे काम न्यायसंगत आणि भ्रष्टाचार रोखण्याचे काम झाले. अन्यथा शासनाने भ्रष्टाचाराला वाव दिला आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. बजेट मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी धोरणाप्रमाणे निधी तर दिलाच पाहिजे .परंतु, जो काही निधी दिला जाणार आहे त्याचा वापर प्रामाणिक पणे, लाभार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शोषण न होता झाला पाहिजे. शोषण ,अडवणूक व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झालेत तर ज्यांचे विकासासाठी बजेट आहे त्यांना न्याय मिळेल. ह्याची संपूर्ण जबाबदारी सनदी अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेची आहे. समाज कल्याण विभागाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. दि 17 फेब्रुवारी 2010 च्या Vision Document मध्ये हा विषय मंत्री परिषदेकडून मंजूर आहे. अमलबजावणी कडे मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. एक महत्वाची गोष्ट, बजेट भाषणात, “सुंदर माझे कार्यालय” ही एक चांगली संकल्पना मांडण्यात आली आहे. शेवटी कोणत्याही योजनेचे /उपक्रमाचे यश हे विशेषतः सनदी अधिकारी आणि सत्ताधारी – विरोधक राजकीय नेत्याच्या इच्छाशक्ती वर अवलंबून आहे. असे स्पष्ट मत इ. झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे.
संविधान जागृती अभियानाचा एक भाग म्हणून, प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी “संविधान स्तंभ -प्रास्ताविकेसह ” उभारावा अशी मागणी , माननीय सुप्रियाताई सुळे, लोकसभा सदस्य यांनी मा. मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून केली होती संविधान फाऊंडेशन च्या वतीने सुद्धा ह्या मागणीचे समर्थन करित ” संविधान सभागृह” आमदार -खासदार निधीतून किंवा जिल्हा नियोजन समिती मार्फत, त्यांच्याकडील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी च्या निधीतून करावे, अशी मागणी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यसचिव यांना केली होती. याबाबतीत अजून कोणतीही घोषणा झाली नाही. दि. 10 मार्च 2021 च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये दिल्ली चे मा.मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने ” देशभक्ती “बजेट मांडले. देशप्रेम-देशभक्ती वृद्धिंगत साठी , 45 कोटी खर्च करून High Mast- पाचशे- 500 -तिरंगा ,दिल्लीत सर्वत्र उभारले जाणार आहेत. नाविन्यपूर्ण व अभिनंदनीय निर्णय आहे. सर्व मागण्या विचारात घेता, पुरोगामी महाराष्ट्र सरकारने ,संविधान जागृतीचे अभियान राबवून संविधानाच्या विचाराचे नागरिक घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. हे देश भक्तीचे व राष्ट्र निर्माणाचे कार्य ठरेल. असे मत ही संविधान फाऊंडेशन चे वतीने इ. झेड खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे. संविधानाचा भारत घडविणे आपले सगळ्यांचेच कर्तव्य आहे.
दि. 01 मार्च 2021 ला सुरू झालेले बजेट अधिवेशन 10 मार्च 2021 ला संपले. सभागृहात सामान्य माणसांना काय मिळाले,? कोणते प्रश्न सुटले, ? कोणते निर्णय दुर्बल घटकांच्या कल्याणाचे झालेत ? ह्याची सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे. संविधान फौंडेशन आणि इतर समविचारी संघटना चे वतीने ,दुर्बल घटकांचा विकासाचे बजेट आणि कल्याणाचे धोरण यावर ऑनलाइन चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, मीडिया , आणि नागरिक यांचा रोल आणि उत्तरदायित्व यावर लवकरच वेबिनर करणार असल्याचे इ. झेड खोब्रागडे यांनी सांगितले. तशी सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडच्या काळात विशेषतः या दशकात, फार अस्वस्थ करणाऱ्या घटना , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात आणि देशात ही घडत आहेत. लोकशाही गणराज्य देशात लोकसत्तेवर धर्मसत्ता हावी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाला आहे, संविधानाचा सोयी प्रमाणे वापर-गैरवापर हे फार देशहितासाठी धोकादायक आहे. संविधान सभेत दि. 25 नोव्हेंबर1949 च्या भाषणात संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला आणि धोके सांगितले आहेतच. हे लक्षात घेण्याची खूप गरज आहे.लोकशाही समृद्ध करणेसाठी विरोधी पक्ष मजबूत असणे आवश्यकच आहे. परंतु, चर्चा, लोक कल्याणाच्या आणि विकासाच्या प्रश्नावर व्हावी, अन्याय अत्याचारांच्या विरोधात व्हावी, सुशासनासाठी भ्रष्टाचार व जातीय भेदभाव रोखण्यासाठी व्हावी. अधिवेशनाचा अमूल्य वेळ शोषित वंचितांच्या समस्या सोडविण्यासाठी खर्ची पडावा . आम्ही उपस्थित केलेल्या व सरकारकडे पूर्वीच सादर केलेल्या विषयावर सकारात्मक निर्णय व्हावेत जेणेकरून दुर्बल घटकांच्या जीवनात सुखाचे क्षण येतील. असे विविध विषयांवरील विकासाच्या दृष्टीने,देशहितार्थ विचार इ. झेड .खोब्रागडे, भाप्रसे से. नि. संविधान फौंडेशन, नागपूर
यांनी आज आपल्या वैचारिक लेखनातून जनहिताच्या दृष्टीने व्यक्त केले आहे.

मुंबई /प्रतिनिधी –
चक्रधर मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *