BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ! ‘बहुजन हितकारिणी सभे’चा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप; दीक्षाभूमीच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले! ​”दीक्षाभूमीबाबत विेषारी पुरुषी भूमिका”; बंडूभाऊ नगराळे यांचा जोरदार प्रहार; श्यामकुळ आणि जोरगेवार यांच्या वादावरही मोठे भाष्य!

Summary

चंद्रपूर: चंद्रपूर येथील दीक्षाभूमीबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेवरून बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. बंडूभाऊ उर्फ नागवंश नगराळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत एक खळबळजनक प्रेसनोट जारी केली आहे. वूट बँकेच्या संवर्धनासाठी केलेल्या कामामुळे कोणाला ‘विकासपुरुष’ म्हटले जात असेल […]

चंद्रपूर:

चंद्रपूर येथील दीक्षाभूमीबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेवरून बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. बंडूभाऊ उर्फ नागवंश नगराळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत एक खळबळजनक प्रेसनोट जारी केली आहे. वूट बँकेच्या संवर्धनासाठी केलेल्या कामामुळे कोणाला ‘विकासपुरुष’ म्हटले जात असेल याबद्दल हरकत नाही, परंतु चंद्रपूर दीक्षाभूमीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आ. मुनगंटीवार हे ‘विषारी पुरुषी’ ठरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

​🎬 “दीक्षाभूमीसाठी एक रुपयाही दिला नाही, उलट उड्डाणपूल बनवून झाकण्याचा प्रयत्न!”

​प्रेसनोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी बहुजन हितकारिणी सभेच्या शिष्टमंडळाने दीक्षाभूमीसंदर्भात भेट दिली असता, “दीक्षाभूमीसाठी नवीन चंद्रपूर येथे किंवा इतरत्र जागा माग-कमी जागा आहे” असे उत्तर आ. मुनगंटीवार यांनी दिले होते, असा दावा नगराळे यांनी केला आहे.

​माजी आमदार नाना श्यामकुळ यांच्यावर टीका: गेल्या २० ते २५ वर्षे चंद्रपूरचे आमदार राहूनही दीक्षाभूमीसाठी एक रुपयाही निधी मिळवून दिला नाही, उलट दीक्षाभूमीला झाकण्यासाठी अनावश्यक उड्डाणपूल बनवून घेतला, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.

​’वार’ करण्याच्या धोरणावर आक्षेप: “माझ्या नावात वार आहे, वार कधी आणि कसा करायचा हे मला चांगले ठाऊक आहे लक्षात ठेवा” अशी धमकी यापूर्वी देण्यात आली होती, असा दावाही यात करण्यात आला आहे.

​⚡ ५६ कोटींच्या निधीवरून पेटले राजकारण; आंबेडकरी अनुयायांना शांततेचे आवाहन!

​स्पर्धक असलेले आमदार किशोर जोरगेवार यांनी दीक्षाभूमीसाठी ५६ कोटी रुपयांचा शासनाकडून निधी मंजूर करून घेतल्याने विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप करत, पहिला हप्ता आल्याबरोबर विरोधकांकडून ‘वार’ सुरू करण्यासाठी श्यामकुळ यांच्या जवळच्या लोकांना हातात धरून अचानक कृत्रिम आक्रोष निर्माण करण्यात आल्याचे नगराळे यांनी म्हटले आहे.

​दुसऱ्या रॅली आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचा मंच ताब्यात घेण्याचे ‘विषारी कार्य’ याद्वारे सुरू असून, याद्वारे मोठा वाद निर्माण करून निधी परत जाण्यासाठी कारणे शोधली जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही षड्यंत्राला बळी न पडता आंबेडकरी अनुयायांनी नेहमीप्रमाणे दीक्षाभूमीवरील दोन दिवसीय महोत्सव अत्यंत शांततेत पार पाडावा, असे आवाहन बहुजन हितकारिणी सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

​ब्युरो रिपोर्ट, चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *