BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

​🚨 भंडारा जिल्ह्यात ‘खाकीचा रुद्र अवतार’! सट्टा, आयपीएल बुकी आणि दारू माफियांवर पोलिसांचा ‘मेगा सर्जिकल स्ट्राईक’

Summary

​🔥 एकाच रात्रीत ३५ अड्ड्यांवर पोलिसांची एकाच वेळी झडप; तब्बल ८ लाख २८ हजार २४५ रुपयांच्या मुद्देमालासह गुन्हेगार गजाआड! ​भंडारा (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीचे साम्राज्य मुळापासून उखडून टाकण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे धडाकेबाज पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी […]

​🔥 एकाच रात्रीत ३५ अड्ड्यांवर पोलिसांची एकाच वेळी झडप; तब्बल ८ लाख २८ हजार २४५ रुपयांच्या मुद्देमालासह गुन्हेगार गजाआड!

​भंडारा (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीचे साम्राज्य मुळापासून उखडून टाकण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे धडाकेबाज पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी दिलेल्या ‘क्लीन अप’ आदेशानंतर संपूर्ण जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सट्टा पट्टी, हायटेक आयपीएल क्रिकेट बेटिंग आणि गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी ‘मेगा सर्जिकल स्ट्राईक’ केला.

​या वादळी कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्यांवरून ३९,८८३ रुपये आणि दारू अड्ड्यांवरून ७,८८,३६२ रुपये, असा एकूण ८ लाख २८ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ माजली असून माफियांचे धाबे दणाणले आहेत.

​🎬 PART 1: जुगार आणि ‘आयपीएल’ बुकींच्या साम्राज्यावर पोलिसांची झडप!

​पोलिसांनी हायटेक जुगार आणि सट्टा चालवणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करत एकूण ५ मोठ्या कारवाया केल्या:

​१) भंडारा पोलीस ठाणे (मटका सट्टा किंग पोलिसांच्या जाळ्यात): राम मंदिर वार्ड परिसरात मटका जुगाराची पट्टी लिहिताना पोलिसांनी मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त केला.

​आरोपी: १) राजू फागोजी रंभाड (वय ४२, रा. राम मंदिर वार्ड, भंडारा), २) देवदास पराते (वय ५५, रा. आंबेडकर वार्ड).

​कलम: अप. क्र. ९१०/२०२६ कलम १२(अ) म.जु.का. सह कलम ४९ भा.न्या.सं.

​जप्त माल: कल्याण मटका आकडे लिहिलेली सट्टा पट्टी, कार्बन तुकडा आणि नगदी १,२८० रुपये (एकूण किंमत: १,२८५ रु.).

​२) तुमसर पोलीस ठाणे (हायटेक आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर ‘रेड’): तामसवाडी परिसरात आयपीएल मॅचवर कोट्यवधींचा जुगार खेळवणाऱ्या बुकींवर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने झडप घातली.

​आरोपी: १) अभिषेक शंखपाल ढबाले (वय २५, रा. तामसवाडी, तुमसर), २) प्रणय प्रेमदास राऊत (वय ३०, रा. तुमसर – फरार, शोध सुरू).

​कलम: अप. क्र. ५५७/२०२६ कलम १२ (अ) म.जु.का. सह कलम ४९ भा.न्या.सं.

​जप्त माल: आयपीएल मॅचचे आकडे लिहिलेले रजिस्टर, ३०,००० रुपयांचे दोन अँड्रॉइड मोबाईल, नगदी ५,००० रुपये आणि १,५०,००० रुपयांची बजाज पल्सर १५० मोटारसायकल (MH-40 AC-4526) (एकूण किंमत: १,८५,००० रु.).

​३) तुमसर पोलीस ठाणे (कल्याण मटका चालकावर कारवाई): जगनाडे नगरात उघडपणे मटका घेणाऱ्यावर पोलिसांनी झडप घातली.

​आरोपी: दीपक सेवकराव उईके (वय ३२, रा. जगनाडे नगर, तुमसर).

​कलम: अप. क्र. ५६०/२०२५ कलम १२(अ) म.जु.का.

​जप्त माल: मटक्याचे आकडे लिहिलेली सट्टापट्टी, डॉटपेन, नगदी १,१८० रुपये आणि ६,००० रुपयांचे टेक्नो कंपनीचे मोबाईल डिव्हाइस (एकूण किंमत: ७,०८० रु.).

​४) आंधळगाव पोलीस ठाणे (राजधानी नाईट सट्टा उद्ध्वस्त): कांद्री भागात सट्टा घेणाऱ्या वृद्ध बुकीला पोलिसांनी रंगेहात पकडले.

​आरोपी: बाबर रमजान च्वारे (वय ६३, रा. कांद्री).

​कलम: अप. क्र. २०३/२०२६ कलम १२ (अ) म.जु.का.

​जप्त माल: राजधानी नाईटचे आकडे लिहिलेली सट्टापट्टी, पेन आणि नगदी १३० रुपये (एकूण किंमत: १३५ रु.).

​५) सिहोरा पोलीस ठाणे (प्लास्टिक बिले वापरून चालणारा जुगार पकडला): आसोली शिवारात प्लास्टिकच्या बिलांवर नंबर टाकून जुगार खेळणाऱ्या गोंदिया व लाखनीच्या टोळीला पोलिसांनी घेरले.

​आरोपी: १) अभिलाश जयेंद्र मेश्राम (वय ३०, रा. आसोली, जि. गोंदिया), २) रजा मुनवर जाफरी (वय २४, रा. बाजार वार्ड, लाखनी).

​कलम: अप. क्र. १६५/२०२६ कलम १२ (अ) म.जु.का. सह कलम ४९ भा.न्या.सं.

​जप्त माल: नंबर लिहिलेले गोलाकार प्लास्टिक बिल्ले, नगदी ६०० रुपये आणि १५,००० रुपयांचा रियलमी कंपनीचा मोबाईल (एकूण किंमत: १५,६११ रु.).

​🧪 PART 2: कारधा पोलिसांचा ‘मेगा दारू स्ट्राईक’! कोका जंगलाच्या छायेत चालणाऱ्या मोठ्या भट्ट्या उद्ध्वस्त

​कारधा पोलिसांनी नव्या जोमाने कारवाई करत लाखो रुपयांचे मोहा रसायन आणि हातभट्टी दारू जप्त केली:

​६) कारधा पोलीस ठाणे (महानिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त – १): नवेगाव (कोका) येथील जंगलाच्या परिसरात चालणाऱ्या मोठ्या हातभट्टीवर धाड टाकून महिला तस्कराला अटक केली.

​आरोपी: प्रीती नरेश पुसाम (वय ४१, रा. नवेगाव कोका, भंडारा).

​कलम: अप. क्र. ३९८/२०२६ कलम ६५ (फ)(ब)(क)(ड)(ई) म.दा.का.

​जप्त माल: ७८० किलो सडवा मोहापास (किंमत ८२,५०० रु.), १५ प्लास्टिक ड्रम (किंमत १२,००० रु.), ३ लोखंडी ड्रम (३,००० रु.), १२ मण जलाऊ लाकूड (९,६०० रु.), ३० लिटर हातभट्टी दारू (९,००० रु.) आणि जर्मन कटोरा (एकूण किंमत: १,१६,५०० रु.).

​७) कारधा पोलीस ठाणे (कारवाई – २; लाखाचा माल जप्त): नवेगाव कोका भागातच दुसऱ्या एका मोठ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

​आरोपी: निर्मला सुखराम कळनायके (वय ५०, रा. नवेगाव कोका).

​कलम: अप. क्र. ३९९/२०२६ कलम ६५ (फ)(ब)(क)(ड)(ई) म.दा.का.

​जप्त माल: ६६० किलो सडवा मोहापास (किंमत ६७,५०० रु.), १६ प्लास्टिक ड्रम (१२,८०० रु.), ३ लोखंडी ड्रम (३,००० रु.), ११ मण लाकूड (८,८०० रु.), ३० लिटर गावटी दारू (९,००० रु.) आणि भांडी (एकूण किंमत: १,०१,५०० रु.).

​८) कारधा पोलीस ठाणे (आंबाडी शिवारात धाड): * आरोपी: सौ. कविता लेहनदास गजभिये (वय ५४, रा. आंबाडी, भंडारा).

​कलम: अप. क्र. ४०२/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: २० लिटरची प्लास्टिक डबकी व मातीच्या माठात भरलेली ३० लिटर मोहफुलाची दारू (एकूण किंमत: ६,००० रु.).

​९) कारधा पोलीस ठाणे (आंबेडकर वार्डात कारवाई): * आरोपी: सौ. प्रिया लहाणू शेंडे (वय ३०, रा. आंबेडकर वार्ड, कारधा).

​कलम: अप. क्र. ४०४/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: प्लास्टिक डबकी आणि बिसलेरी बॉटल्समध्ये लपवून ठेवलेली २३ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: ४,६०० रु.).

​🚨 PART 3: करडी, भंडारा आणि मोहाडी पोलिसांचा तस्करांना दणका

​१०) करडी पोलीस ठाणे (पॅशन प्रो गाडीसह दारू जप्त): दुचाकीवरून बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या तस्कराला पोलिसांनी नाकाबंदीत पकडले.

​आरोपी: छबीलाल ताराचंद केवट (वय ४३, रा. बेलगाव, भंडारा).

​कलम: अप. क्र. ११५/२०२६ कलम ६५ (अ) म.दा.का.

​जप्त माल: ३० लिटर मोहाची दारू (६,००० रु.) आणि ६०,००० रुपयांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (MH-36 N-3854) (एकूण किंमत: ६६,००० रु.).

​११) भंडारा पोलीस ठाणे (आंबेडकर वार्ड): * आरोपी: सौ. रेणुका किरण बर्वे (वय ४३, रा. आंबेडकर वार्ड, भंडारा).

​कलम: अप. क्र. ९०७/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: १० लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: २,००० रु.).

​१२) भंडारा पोलीस ठाणे (गौतम बुद्ध वार्ड – डियो मोपेड जप्त): मोपेड गाडीच्या डिक्कीत देशी दारू लपवून वाहतूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेरले.

​आरोपी: प्रतीक किरण बर्वे (वय २२, रा. गौतम बुद्ध वार्ड, भंडारा).

​कलम: अप. क्र. ९०८/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: ३५,००० रुपयांची होंडा डियो मोपेड (MH-36 AE-6043) आणि देशी कोकण दारूच्या १२ बॉटल्स (एकूण किंमत: ३५,४८० रु.).

​१३) भंडारा पोलीस ठाणे (शास्त्री वार्ड): * आरोपी: श्रीमती राजश्री दिनेश नागदेवे (वय ३७, रा. लाल बहादूर शास्त्री वार्ड, भंडारा).

​कलम: अप. क्र. ९०९/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: प्लास्टिक डबकीत भरलेली १० लिटर मोहाची दारू (एकूण किंमत: २,००० रु.).

​१४) मोहाडी पोलीस ठाणे (टिळक वार्डात धाड): * आरोपी: शिवचरण जयदेव नंदनवार (वय ५६, रा. टिळक वार्ड, मोहाडी).

​कलम: अप. क्र. १९१/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: १५ लिटर मोहाफुलाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: ३,००० रु.).

​१५) मोहाडी पोलीस ठाणे (सितेपार शिवार): * आरोपी: घनश्याम महादेव शिंदे (वय ७०, रा. सितेपार, मोहाडी).

​कलम: अप. क्र. १९२/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: ६० किलो सडवा मोहाफासने भरलेला निळा प्लास्टिक ड्रम (एकूण किंमत: १२,००० रु.).

​१६) मोहाडी पोलीस ठाणे (बेटाळा शिवार): * आरोपी: श्रीमती मंजुषा रवींद्र कुंभलकर (वय ३३, रा. बेटाळा, मोहाडी).

​कलम: अप. क्र. १९३/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: ५ लिटर मोहाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: १,००० रु.).

​१७) जवाहरनगर पोलीस ठाणे (परसोडी शिवार): * आरोपी: मोरेश्वर नामदेव कावळे (वय ५१, रा. परसोडी, भंडारा).

​कलम: अप. क्र. २०२/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: ४ लिटर गावटी हातभट्टी दारू (एकूण किंमत: ८०० रु.).

​🌲 PART 4: आंधळगाव, गोबरवाही आणि तुमसर पोलिसांचा जंगलातील अड्ड्यांवर दणका

​१८) आंधळगाव पोलीस ठाणे (दावेझरी जंगलातील भव्य दारू फॅक्टरी उद्ध्वस्त): पोलिसांनी पहाटेच्या सुमारास दावेझरीच्या जंगलात धाडसी कारवाई करत एकाला अटक केली, तर दोन कुख्यात आरोपी फरार झाले.

​आरोपी: १) मनोज सुदाम मरस्कोल्हे (वय ३६, रा. दावेझरी, तुमसर – अटक), २) दीपक उर्फ गुड्डू पतीराम धुर्वे (रा. आंचागड – फरार), ३) बंडू प्रधान (रा. दावेझरी, मोहाडी – फरार).

​कलम: अप. क्र. २०१/२०२६ कलम ६५ (फ)(ब)(क)(ड)(ई), ८३ म.दा.का.

​जप्त माल: २३० लिटर हातभट्टी दारू, ३६० किलो सडवा मोहाफास, जर्मन करच्या, पाईप आणि लाकडे (एकूण किंमत: १,१९,४०० रु.).

​१९) गोबरवाही पोलीस ठाणे (पाथरी शिवारात मोठी जप्ती): * आरोपी: खुशाल जोशीराम पुष्पतोडे (वय ३३, रा. पाथरी, तुमसर).

​कलम: अप. क्र. २१२/२०२६ कलम ६५ (फ) म.दा.का.

​जप्त माल: ५ निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरलेला ६०० किलो सडवा मोहापास (एकूण किंमत: ६०,००० रु.).

​२०) तुमसर पोलीस ठाणे (हसारा गाव): * आरोपी: राजेंद्र मनीराम शिंदे (वय ५२, रा. हसारा, तुमसर).

​कलम: अप. क्र. ५६१/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: बिसलेरी बॉटल्समध्ये भरलेली ११ लिटर मोहाची दारू (एकूण किंमत: २,२०0 रु.).

​२१) तुमसर पोलीस ठाणे (देव्हाडी रेल्वे परिसर): * आरोपी: सौ. बबीता रायसिंग नागपुरे (वय ३६, रा. टिळक वार्ड, देव्हाडी, तुमसर).

​कलम: अप. क्र. ५६२/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: प्लास्टिक डबकीत भरलेली १० लिटर हातभट्टी दारू (एकूण किंमत: १,००0 रु.).

​🚨 PART 5: साकोली, लाखनी, पालांदूर, अड्याळ, पवनी आणि लाखांदूर पोलिसांचा ‘झाडू मारो’ पॅटर्न

​जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एकाच रात्रीत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले:

​२२) साकोली (पळसगाव शिवार): * आरोपी: निळकंठ चिंतामन कवरे (वय ४२, रा. पळसगाव).

​कलम: अप. क्र. ३७७/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: टायगर ब्रँड देशी दारूचे १० प्लास्टिक पव्वे (एकूण किंमत: ४०० रु.).

​२३) साकोली (जांभळी सडक): * आरोपी: कुलदीप हिरामण मेश्राम (वय ३८, रा. जांभळी सडक, साकोली).

​कलम: अप. क्र. ३७८/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: २ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: ४०० रु.).

​२४) साकोली (सानगडी परिसर): * आरोपी: कमलेश प्रल्हाद धकाते (वय ३९, रा. सानगडी, साकोली).

​कलम: अप. क्र. ३८०/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: देशी दारू संत्रीचे ११ प्लास्टिक पव्वे (एकूण किंमत: ४४० रु.).

​२५) लाखनी (तलाव वार्ड): * आरोपी: निलेश घनश्याम जांभूळकर (वय ४४, रा. तलाव वार्ड, लाखनी).

​कलम: अप. क्र. १९०/२०२६ कलम ६५(ई) म.दा.का.

​जप्त माल: ५ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: ५०० रु.).

​२६) पालांदूर (मुरमाडी तुप शिवार): * आरोपी: नितेश राजरतन मेश्राम (वय ४०, रा. मुरमाडी/तुप, लाखनी).

​कलम: अप. क्र. १०१/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: देशी दारूने भरलेले २० नग प्लास्टिक टिल्लू पव्वे (एकूण किंमत: ८०० रु.).

​२७) अड्याळ (जामगाव शिवार – ४०० किलो सडवा जप्त): * आरोपी: शामकुमार सिताराम सुखदेवे (वय ५२, रा. जामगाव, भंडारा).

​कलम: अप. क्र. २०५/२०२६ कलम ६५ (फ) म.दा.का.

​जप्त माल: ८ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये भरलेला ४०० किलो सडवा मोहाफास (एकूण किंमत: ८०,००० रु.).

​२८) पवनी (निलज गाव): * आरोपी: श्रीमती जनाबाई रवी पवारे (वय ५२, रा. निलज, पवनी).

​कलम: अप. क्र. २६६/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: कोका देशी दारू संत्रा ९९९ चे ८ नग पव्वे (एकूण किंमत: ६४० रु.).

​२९) लाखांदूर (भागडी शिवारात रेड): * आरोपी: युवराज बोंदरू शहारे (वय ५२, रा. भागडी, लाखांदूर).

​कलम: अप. क्र. २०३/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: १५ लिटर बेकायदेशीर मोहाची हातभट्टी दारू (एकूण किंमत: ३,००० रु.).

​३०) साकोली (सितेपार विर्सी): * आरोपी: सौ. शोभा बलराज कद्रेवार (वय ५०, रा. सितेपार विर्सी, साकोली).

​कलम: अप. क्र. ३६७/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: देशी दारू संत्रीच्या १२ सीलबंद काचेच्या बॉटल्स (एकूण किंमत: ९६० रु.).

​३१) पालांदूर (केसलवाडा शिवार): * आरोपी: रूपचंद भाऊराव कातोरे (वय ४३, रा. केसलवाडा, लाखनी).

​कलम: अप. क्र. ९४/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: १५ नग प्लास्टिक देशी दारू पव्वे (एकूण किंमत: ६०० रु.).

​३२) पवनी (रामपुरी वार्ड हनुमान मंदिर परिसर): * आरोपी: संजय निळकंठ तलमले (वय ४९, रा. रामपुरी वार्ड, पवनी).

​कलम: अप. क्र. २६७/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: संतु संत्रा टँगो प्रिमियम देशी दारूचे ६ नग पव्वे (एकूण किंमत: ४८० रु.).

​३३) अड्याळ (चिचाळ गाव): * आरोपी: आशिष मुरलीधर रोडगे (वय ४०, रा. चिचाळ, पवनी).

​कलम: अप. क्र. १९७/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: प्लास्टिक डबक्यात भरलेली ५ लिटर हातभट्टी दारू (एकूण किंमत: १,००० रु.).

​३४) अड्याळ (नवरगाव शिवार): * आरोपी: प्रकाश चुडामण गणवीर (वय ४५, रा. नवरगाव, भंडारा).

​कलम: अप. क्र. १९८/२०२६ कलम ६५ (ई) म.दा.का.

​जप्त माल: ६० लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू आणि रबरी ट्यूब (एकूण किंमत: १२,००० रु.).

​३५) अड्याळ (केसलवाडा – जिल्ह्यातील सर्वात मोठा दारूचा अड्डा उद्ध्वस्त; २.५ लाखांची जप्ती): या महा-मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई केसलवाडा येथे करण्यात आली, जिथे दारू तयार करण्याचा भलामोठा कारखानाच पोलिसांनी उखडून टाकला.

​आरोपी: श्रीकांत बंडू गजभिये (वय ४२, रा. केसलवाडा, पवनी).

​कलम: अप. क्र. १९९/२०२६ कलम ६५ (ब)(क)(ड)(ई)(फ) म.दा.का.

​जप्त माल: १२ मोठ्या प्लास्टिक चुंगळ्यांमधील ६०० किलो सडवा मोहापास (१,२०,००० रु.), ३ लोखंडी मोठ्या ड्रममधील ६०० किलो सडवा मोहापास (१,२०,००० रु.), ३ मोठे जुने लोखंडी ड्रम (३,००० रु.), ५ लहान पिंप (१०० रु.), ३ जर्मन घमेले (२,४०० रु.), ३० लिटर तयार दारू (६,००० रु.) आणि १० मण जलाऊ लाकडे (२,००० रु.) (एकूण किंमत: २,५३,५०० रु.).

​👮‍♂️ मा. पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा!

​सदरची धडाकेबाज कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, गुन्हे शाखेचे (LCB) पथक आणि पोलीस अंमलदारांनी अत्यंत चोखपणे बजावली आहे. “जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; हा तर फक्त ट्रेलर आहे, चित्रपट अजून बाकी आहे!” असा सज्जड दम या कारवाईच्या माध्यमातून खाकीने दिला आहे.

​वृत्तसंकलन: अमर वासनिक न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

संपर्क: ७७७४९८०४९१ वेबसाइट: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *