प्रसाद काठीकर यांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर महानगर महामंत्री पदी नियुक्ती
नागपूर:
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाची विदर्भ प्रांत बैठक नागपूर येथील पवार समाज भवन, कुकडे लेआउट येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रसाद श्रीकांत काठीकर यांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर महानगर महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांच्या आदेशानुसार आणि विदर्भ प्रांतातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने ही घोषणा करण्यात आली. संघटनेच्या केंद्रीय मंत्री तथा विदर्भ प्रांत प्रभारी श्रीमती मालाबेन रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत, विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी यांनी ही अधिकृत घोषणा केली.
यावेळी बोलताना डॉ. मोतीलाल चौधरी म्हणाले की, प्रसाद काठीकर हे संघटनेच्या स्थापनेपासून सक्रिय असून त्यांनी आतापर्यंत विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. हिंदू समाजासाठी करण्यात आलेली आंदोलने आणि विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत स्वागत केले.
या मान्यवरांची होती उपस्थिती:
या बैठकीला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांत मंत्री योगेश गायकवाड, कोषाध्यक्ष तथा हिंदू हेल्पलाईन विदर्भ प्रांत मंत्री वैभव कपूर, नागपूर जिल्हा महामंत्री राजेश बोपुलकर, राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जयस्वाल, महामंत्री यजेंद्रसिंग ठाकूर, राष्ट्रीय महिला परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष श्रीमती अस्मिता भट्ट यांच्यासह नागपूर जिल्हा आणि महानगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
