BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मोहाडी पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! खमारी गावाच्या वेशीवरच तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त ​स्थानिक गुन्हे शाखेची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई; विनाक्रमांकाच्या ‘स्वराज’ ट्रॅक्टरसह तस्कर जेरबंद!

Summary

मोहाडी (भंडारा): भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली रेती माफियांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत मोहाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. खमारी बु. ते मोहाडी रोडवर पोलिसांनी सापळा रचून एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरसह अवैधरित्या रेती चोरणाऱ्या तस्कराला रंगेहात पकडले. या […]

मोहाडी (भंडारा):
भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली रेती माफियांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत मोहाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. खमारी बु. ते मोहाडी रोडवर पोलिसांनी सापळा रचून एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरसह अवैधरित्या रेती चोरणाऱ्या तस्कराला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​पहाटेचा थरार: पोलिसांचा अचूक निशाणा!
​दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६:०० ते ७:०० वाजेच्या सुमारास, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) भंडाराचे पथक गस्तीवर होते. खमारी (बु.) गावाच्या प्रवेशद्वाराजवळ एक शेंदरी रंगाचा स्वराज ट्रॅक्टर संशयास्पदरित्या रेती भरून येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने धाड टाकून ट्रॅक्टर थांबवला.
​२१ वर्षीय तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!
​पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता, त्याने आपले नाव देवानंद हेमराज दमाहे (वय २१, रा. खमारी बुज) असे सांगितले. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे १ ब्रास रेती चोरून नेली जात होती. रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता, आरोपीकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती.
​७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
​या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
​१) शेंदरी रंगाचा स्वराज ट्रॅक्टर (DI 742 FE – विनाक्रमांक): किंमत ६,००,००० रुपये.
​२) विनाक्रमांकाची ट्रॉली: किंमत १,००,००० रुपये.
​३) अंदाजे १ ब्रास रेती: किंमत ६,००० रुपये.
​एकूण जप्त मुद्देमाल: ७,०६,००० रुपये.
​गुन्हा दाखल, तपासाची चक्रे वेगात!
​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल लक्ष्मणराव तुमाने यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार खोकले अत्यंत बारकाईने करत आहेत.
​पोलीस योद्धा न्यूज अलर्ट: शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आणि निसर्गाची लूट करणाऱ्या रेती चोरांविरुद्ध मोहाडी पोलिसांनी दिलेला हा दणका जिल्ह्यातील इतर तस्करांसाठी मोठा इशारा ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 090222 44767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *