BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

धान उत्पादकांना प्रति हेक्टर २० हजारांचा बोनस द्या; आ. सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे जोरदार मागणी मंत्री छगन भुजबळ यांचा सकारात्मक प्रतिसाद; खरेदी उद्दिष्ट वाढवण्यावरही भर

Summary

चंद्रपूर : वाढत्या उत्पादन खर्च, मजुरी दरातील वाढ आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा देण्याची मागणी करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर करण्याची आग्रही मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याचे […]

चंद्रपूर : वाढत्या उत्पादन खर्च, मजुरी दरातील वाढ आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा देण्याची मागणी करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर करण्याची आग्रही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनजी भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती सविस्तर मांडली. धान उत्पादनाचा खर्च वाढला असून मजुरी, खते, बियाणे आणि इंधनदर यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस देऊन त्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
धान खरेदी उद्दिष्ट वाढवण्याची मागणी
२०२५-२६ च्या पणन हंगामात धान खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवावे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ३९ खरेदी केंद्रांवर ९१,६७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून सध्या मंजूर असलेले ५.४७ लाख क्विंटल उद्दिष्ट संपत आले आहे. अनेक केंद्रांवर २ ते ३ लाख क्विंटल धान ऑनलाईन नोंदणीअभावी उघड्यावर पडून असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
पीक पाहणी अहवालानुसार जिल्ह्यात ८ ते १० लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे किमान ३ लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट तातडीने मंजूर करून पुढील कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.
मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
या सर्व मुद्द्यांवर मंत्री ना. छगन भुजबळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. धान उत्पादकांना न्याय मिळावा, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सरकार संवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांना १६२८ कोटी रुपयांचा धान बोनस मिळाला होता. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि बोनस मिळावा यासाठी आपण सातत्याने लढत राहू, अशी भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *