क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा जिल्ह्यात दारू व जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी मोठी कारवाई ₹3,83,175 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 30 हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल

Summary

भंडारा | प्रतिनिधी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री, हातभट्टी दारू व जुगार अड्डे समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या स्पष्ट आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी व्यापक धडक कारवाई राबविण्यात आली. या मोहिमेत ₹3,83,175 रुपयांचा […]

भंडारा | प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध दारूविक्री, हातभट्टी दारू व जुगार अड्डे समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या स्पष्ट आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी व्यापक धडक कारवाई राबविण्यात आली. या मोहिमेत ₹3,83,175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा व महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व पोलीस अंमलदारांनी संयुक्तपणे केली.
पोलीस स्टेशन जवाहरनगर
अप.क्र. 22/2026 | कलम 65(फ) म.दा.का.
आरोपी: सुरज प्रभाकर नंदेश्वर (वय 29), रा. इंदिरा नगर, सावरी, ता. जि. भंडारा
जप्त मुद्देमाल:
10 प्लास्टिक पन्न्या – एकूण 400 किलो सडवा मोहाफास (₹80,000)
लोखंडी मोठा ड्रम (₹500)
80 किलो जलाहु काळया (₹1,600)
एकूण: ₹82,100
अप.क्र. 24/2025 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: महिला आरोपी (वय 40), रा. राजेगाव, ता. जि. भंडारा
मुद्देमाल: 9 लिटर मोहाफुल हातभट्टी दारू – ₹1,800
पोलीस स्टेशन वरठी
अप.क्र. 21/2026 | कलम 65(फ) म.दा.का.
आरोपी: राजु संपत इलमे (वय 42), रा. हनुमान वार्ड, वरठी
मुद्देमाल:
8 निळे ड्रम – 400 किलो सडवा मोहाफास (₹1,00,000)
8 प्लास्टिक ड्रम (₹6,400)
एकूण: ₹1,06,400
पोलीस स्टेशन भंडारा
अप.क्र. 167/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: पवन नरेंद्र नगराळे (वय 40), रा. लालबहादूर शास्त्री वार्ड, भंडारा
मुद्देमाल: 2 लिटर मोहाफुल हातभट्टी दारू – ₹400
पोलीस स्टेशन मोहाडी
अप.क्र. 17/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: सुखराम वारलु लिल्हारे (वय 55), रा. मांडेसर, ता. मोहाडी
मुद्देमाल: 5 लिटर मोहाफुल हातभट्टी दारू – ₹1,000
पोलीस स्टेशन कारधा
अप.क्र. 36/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: महिला आरोपी, रा. आमगाव (दिघोरी), ता. जि. भंडारा
मुद्देमाल: 10 लिटर हातभट्टी दारू – ₹2,000
पोलीस स्टेशन करडी
अप.क्र. 17/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: महिला आरोपी (वय 40), रा. देव्हाडा खुर्द, ता. मोहाडी
मुद्देमाल: 15 लिटर हातभट्टी दारू – ₹3,000
पोलीस स्टेशन तुमसर
अप.क्र. 34/2026 | कलम 65(फ) म.दा.का.
आरोपी: अंकुश मनोहर नेरकर (वय 36), रा. डोंगरला, ता. तुमसर
मुद्देमाल: 625 किलो सडवा मोहाफास – ₹1,25,000
अप.क्र. 38/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: सुधाकर सुखदेव पंधरे (वय 33), रा. परसवाडा, ता. तुमसर
मुद्देमाल: 5 लिटर हातभट्टी दारू
अप.क्र. 39/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: रितेश सिद्धार्थ डोंगरे (वय 37), रा. चिचोली, ता. तुमसर
मुद्देमाल: 5 लिटर हातभट्टी दारू – ₹1,000
पोलीस स्टेशन आंधळगाव
अप.क्र. 11/2026 | कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी: बाळकृष्ण रामरतन शेंडे (वय 45), रा. हरदोली, ता. मोहाडी
मुद्देमाल: 13 लिटर हातभट्टी दारू – ₹2,600
अप.क्र. 12/2026 | कलम 12(अ) म.जु.का. (जुगार)
आरोपी: सोनु देवचंद बुराडे (वय 32), रा. लोहारा, ता. तुमसर
मुद्देमाल: कागदी सट्टापट्टी, पेन व रोख ₹370
एकूण: ₹375
इतर पोलीस ठाण्यांतील कारवाई
सिहोरा, गोबरवाही, साकोली, लाखनी, पालांदुर, पवनी, अडयाळ व लाखांदूर येथेही हातभट्टी दारू, देशी दारूचे पव्वे व सडवा मोहाफास जप्त करून संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
एकूण जप्त मुद्देमाल
दारू अड्ड्यांवरील कारवाई : ₹3,82,800
जुगार अड्डा : ₹375
एकूण: ₹3,83,175
पोलीस प्रशासनाचा इशारा
भंडारा जिल्ह्यात अवैध दारूविक्री व जुगार व्यवसायाला थारा दिला जाणार नाही. अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहणार, असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *