BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हाभर जुगार व दारू अड्ड्यांवर एकाचवेळी धडक कारवाई 13 लाख 70 हजारांहून अधिक रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त

Summary

भंडारा | प्रतिनिधी — जिल्ह्यात अवैध धंद्यांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, जिल्हाभरातील जुगार व दारू अड्ड्यांवर एकाचवेळी धडक कारवाई करत १३ लाख ७० हजार ८८० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे […]

भंडारा | प्रतिनिधी — जिल्ह्यात अवैध धंद्यांना मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, जिल्हाभरातील जुगार व दारू अड्ड्यांवर एकाचवेळी धडक कारवाई करत १३ लाख ७० हजार ८८० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत पवनी येथे जुगार अड्ड्यावर धाड घालून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, वरठी, तुमसर, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी, पवनी व अडयाळ या भागांत दारू अड्ड्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, मोहापास, देशी दारू, गाळण साहित्य, प्लास्टिक ड्रम, चुंगळ्या, पिशव्या, बॉटल्या तसेच वाहने असा अवैध साठा हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत अनेक आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही आरोपी फरार आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत दारू अड्ड्यांवरील १३,६९,६५५ रुपये आणि जुगार अड्ड्यावरील १,२२५ रुपये अशी असून, एकूण किंमत १३,७०,८८० रुपये इतकी आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस स्टेशनचे ठाणेदार, अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे पार पाडली. जिल्ह्यातील अवैध दारू व जुगाराचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालविणाऱ्यांना जोरदार दणका बसला असून, सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *