गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Summary

आष्टी (ता. आष्टी) – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने […]

आष्टी (ता. आष्टी) – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रत्यक्ष योगासने व प्राणायाम सत्राने झाली. उपस्थितांना योगाचे प्रकार, शरीर व मनावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी माहिती देण्यात आली. मा. अवसरमोल सर यांनी विविध योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक घेत ध्यान व मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, “योग म्हणजे केवळ व्यायाम नसून, तो जीवनशैली आहे. ध्यान म्हणजे अंतर्मनाशी नाते जोडणारा मार्ग आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात, तसेच प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, म. जोतिराव फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथील प्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत योगाचे प्रत्यक्ष अनुभव घेत याचे महत्त्व आत्मसात केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, क्रीडा विभाग व संयोजन समितीने मेहनत घेतली.

 

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी तालुका
प्रतिनिधि
गजानन पुराम
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *