भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठी येथील कामगारांनी मानले ग्रामसेवकाचे आभार

Summary

वरठी (ता. मोहाडी) – येथील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिक कामगारांनी ग्रामसेवक श्री. दिगंबर गभने यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ९० दिवस अनुभव प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक कामगारांनी अर्ज भरले होते. मात्र, संबंधित कामगार फॉर्म्सवर ग्रामसेवक यांची स्वाक्षरी […]

1-3968×2976-1-0#

वरठी (ता. मोहाडी) – येथील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिक कामगारांनी ग्रामसेवक श्री. दिगंबर गभने यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ९० दिवस अनुभव प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक कामगारांनी अर्ज भरले होते. मात्र, संबंधित कामगार फॉर्म्सवर ग्रामसेवक यांची स्वाक्षरी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता.

कामगारांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता ग्रामसेवक श्री. दिगंबर गभने यांनी सर्व फॉर्म्सवर स्वाक्षरी करून देत कामगारांना दिलासा दिला आहे. या कृतीमुळे अनेक कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थानिक कामगारांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामसेवकाचे आभार मानले असून, भविष्यात देखील अशाच प्रकारे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या सकारात्मक पावलामुळे ग्रामसेवक व कामगार यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *