सरस्वती विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा

अर्जुनी मोरगाव: आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या शरीराची निगा राखावयाची असेल तर योग आणि प्राणायाम यात नियमितता आणून आपण आपले आरोग्य सुदृढ व निरामय बनवू शकतो व आपण आपली वाटचाल योग्य दिशेने करू शकतो असे प्रतिपादन योग दिनानिमित्त आयोजित योगा कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण यांनी केले व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्थानिक सरस्वती विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे यांची होते. दिनांक 21 जून रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिनाचे आयोजन सकाळी 6.30 ते 7.45 या वेळेत करण्यात आले. यावेळी विद्यालयातील जिल्हा विभाग व राज्यस्तरावरील कु. रिया नाकाडे,कु.माही नाकाडे, कु. श्रावणी वंजारी, कुलदीप ब्राह्मणकर, हिमांशू कुंभरे,आशितोष गहाणे यांनी योगासनाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके करून दाखविली.कार्यक्रमाचे योग दिन प्रोटोकॉलनुसार संचालन व मार्गदर्शन विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका माधुरी वनवे यांनी केले तर आभार दिपाली गोल्लीवार यांनी मानले.सदर योग कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी उपस्थित राहून योग कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी योग दिनानिमित्त संकल्प घेऊन शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.