महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना; ऑनलाइन वीजबिल भरा अन् स्मार्ट फोन, व स्मार्ट वॉच जिंका!

कोंढाळी-
सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून काटोल परिमंडलातील चार उपविभागांसाठी एकूण वीस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
लकी डिजिटल ग्राहक योजनेत प्रत्येक उपविभागासाठी प्रथम : एक स्मार्ट फोन, द्वितीय : दोन स्मार्ट फोन आणि तृतीय क्रमांकासाठी बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे.
बंपर योजना
संपर्क करूनही विजेत्यांनी 10 दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षीस देण्यात येतील. तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. काटोल परिमंडलात चार उपविभाग आहेत. यामध्ये काटोल ,कोंढाळी, नरखेड, सावरगाव मोहपा, . या पाच उपविभागातील प्रत्येक उपविभागासाठी पाच बक्षिसे आणि एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉ असे मिळून तब्बल 75 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
थकबाकी नसावी
ग्राहकांना 1 जानेवारी ते 31 मे 2025 पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची 10 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात आली असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.
*मोबाइलवर मिळणार माहिती*
ज्या लघुदाब वीजग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकदाही वीजबिल किंवा त्याचा ऑनलाइन भरणा केलेला नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. 1 जानेवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत येत्या एप्रिल, मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाइटवर व नोंदणीकृत मोबाइलवरही जाहीर होईल. विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या ww.mahadiscom.in वेबसाइट अधिक माहिती उपलब्ध आहे.
वीज वितरण उप विभाग कोंढाळी अंतर्गत संगणकिय -पद्धतीने काढलेल्या पहिल्या ड्रा चे लाभार्थी/ उपभोक्ता सुनंदा भाऊराव उमाळे-रिधोरा-सॅमसंग मोबाईल ,अभयसिंग
रायसि़ंग चव्हाण -वसंतनगर-रेडमी मोबाईल,
रजनिकांत ज्ञानेश्वर क्षिरसागर-कोंढाळी-रेडमी मोबाईल,शेख इक्बाल शेख ईलाही-कोंढाळी- स्मार्ट वाच-
गणेश प्रेम राज खोबरेकर दोडकी-स्मार्ट वाच तथा दुसरे ड्रा मधील उपभोक्ते संजय देवराव ठाकरे- पेठ- सॅमसंग मोबाईल,मित्राजी हरिभाऊ भारती- जुनापानी- रेडमी मोबाईल, वनिता दिनेश सोनबरसे- कोंढाळी
रेडमी मोबाईल,-संबधित वीज- उपभोक्त्यांना
. या ऑनलाइन पद्धतीने वीज बील भरना करणार्या वीज ग्राहकांना कोंढाळी उप विभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामार्फत पाच पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.
अशी माहिती काटोल विभागाचे प्रमुख वीज अधिकारी अघाव तसेच कोंढाळी उपविभागीय वीज पुरवठा अधिकारी प्रणव कुरेवार यांनी दिली आहे.