भाई सदानंद पी.देवगडे यांची विदर्भ अध्यक्ष पदी नियुक्ती
Summary
महाराष्ट्रात राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, मुख्य कार्यालय कोराडी चे केंद्रीय अध्यक्ष मा.चैनदासजी भालाधरे साहेब यांनी केंद्रीय प्रभारी भाई सुभाषसिंग बावरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई सदानंद पि.देवगडे यांना विदर्भ अध्यक्ष पदावर नियुक्त करून […]

महाराष्ट्रात राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, मुख्य कार्यालय कोराडी चे केंद्रीय अध्यक्ष मा.चैनदासजी भालाधरे साहेब यांनी केंद्रीय प्रभारी भाई सुभाषसिंग बावरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई सदानंद पि.देवगडे यांना विदर्भ अध्यक्ष पदावर नियुक्त करून त्यांना पुढील वाटचाली करीता हार्दिक सुभेच्छा दिल्या.मा.भाई सदानंद पि.देवगडे यांनी आजपासून विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह चा पदभार स्वीकारलेला असून त्या पदाची गरिमा कायम ठेवून “प्रत्येक क्षेत्रातील अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यास मी सदैव वचनबद्ध व प्रयत्नशील राहील “असे वचन भाई सदानंद पि.देवगडे ,विदर्भ अध्यक्ष यांनी दिले. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसिएटीव्ह ही संघटना गेल्या विस वर्षांपासून विवीध क्षेत्रातील कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य अगदी प्रामाणिक पणे करीत असून दिवंगत भाई बाबू भालाधरे हे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून हि संघटना कोराडी, खापरखेडा, मौदा, चंद्रपूर, पारस, भुसावळ, नाशिक, परली, तिरोडा (अदानी पावर प्लान्ट) या ठिकाणी विज महानिर्मिती , महापारेषण, महावितरण या तिन्ही क्षेत्रात कार्यरत असून महानगर पालिका, वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड, पि.डब्ल्यू.डि.,व ईतर कंत्राटी कामगार असलेल्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहे.विज क्षेत्रात कार्यरत कंत्राटी कामगारांना विविध भत्ते लागू करून देणारी हि एकमेव संघटना आहे. भाई सदानंद पि.देवगडे हे सर्व प्रथम तीन वर्षे सी.एस.टि.पि.एस.,चंद्रपूर चे शाखा अध्यक्ष होते. त्या नंतर तिन वर्षे चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला.आज परत विदर्भ अध्यक्ष या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे संघटनेच्या प्रत्येक जिल्ह्य़ातील व प्रत्येक शाखेतील कार्यकर्त्यांमध्ये व कामगार बंधू भगिनींमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालेले आहे.