BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

घर फोडी चा गुन्हा उघड, टाटा पंच कार सह 05लाख बीस हजाराचा मुद्दे माल जप्त नागपूर (ग्रा) गुन्हे शाखेची कामगीरी

Summary

काटोल- काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आय यु डी पी भागातील अभय नामदेव कोहळे(47) ह. मु. मेंढेपढार (बा) यांनी काटोल पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली होती की अभय नामदेव कोहळे (सरपंच मेंढेपढार)हे १३ते १७ में चे दरम्यान काटोल येथील […]

काटोल-
काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आय यु डी पी भागातील अभय नामदेव कोहळे(47) ह. मु. मेंढेपढार (बा) यांनी काटोल पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली होती की अभय नामदेव कोहळे (सरपंच मेंढेपढार)हे १३ते १७ में चे दरम्यान काटोल येथील आ यु डी पी भागातील घराला कुलूप लावून मेंढे पठार येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मेंढे पठार येथील घरी राहत होते. या दरम्यान १७मे रोजी रात्री काटोल येथील घरचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून सोन्याच्या चांदीचे दागिने अंदाजे १५तोळे तसेच साढे चार लाख रूपये रोख, तसेच मेंढे पठार (बा ) येथील घरा चे समोर उभी असलेली चार चाकी वाहन टाटा पंच क्रं एम एच -४० सी एक्स – ४४०१असा एकूण दहा लाख ६३०००रूपयांचा मुद्दे माल चोरी गेल्याची तक्रार काटोल पोलीस स्टेशन ला नोंदविण्यात आली होती, या तक्रारीवरून काटोल पोलीसांनी अपराध क्रं ४०६/२०२५अन्वये भा न्या स चे कलम- ३३१(३),३३१(४),३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी काटोल पोलीस स्टेशन तपासणी करत असतांनाच नागपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या गुन्ह्याचे‌ समांतर तपास नागपूर ग्रा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे,यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष सिंह ठाकूर,सागर गोमासे, पो.ह. वा.प्रमोद चव्हाण, प्रमोद तभाने, इक्बाल शेख,रोहन डाखोरे,विनोद कोठे, तसेच राहुल पाटील याचे पथकाकडे सोपविण्यात आला. याप्रकरणी नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व तांत्रिक पद्धतीने तपास करुन या घर फोडी व चार चाकी चोरी च्या चोरी प्रकरणी काटोल येथील दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्या विधिसंघर्ष बालकां कडून चोरी गेलेले ग्रे कलर ची टाटा पंच चार चाकी क्रं एम एच -४० सी एक्स -४४०१ ,दोंन एनराईड मोबाईल तसेच चार चाकी व दुचाकी वाहनांच्या चार चाव्या आणि दोन गॉगल्स आसा एकूण पाच लाख २०हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन सरद चा मुद्देमाल सह सदर प्रकरण पुढील तपासासाठी काटोल पोलीसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. पुढिल तपास काटोल पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *