आज दिनांक 19 फेब्रुवारी ला आष्टी मध्ये शिवाजी जयंती उत्साहात साजरी
आज दिनांक 19 फेब्रुवारी ला आष्टी मध्ये शिवाजी जयंती उत्सवात सजरी करण्यात आली.रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.महिला मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत झाकी घेण्यात आली,आणि महीलाचा डान्स घेण्यात आले, मोठ्या संख्येने महिला वर्ग यांनी डान्स मध्ये भाग घेवून आपले कलागुण सादर केले.तसेच शिवाजी चौक ते आंबेडकर चौक रॅली काढण्यात आली.रॅली मध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग उपस्थित होते.पोलिस अधिकारी आणि कर्मचारी याचा बंदोबस्त होता,अनेक असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. अश्या अनेक विविध कार्यक्रम घेण्यात येवून शिवाजी महाराज जयंती मोठ्या जल्लोषात आष्टी येथे साजरी करण्यात आली.

