हेडलाइन

मन सुन्न करणारी घटना! दुचाकीला पाठीमागून ट्रकची धडक, आई व 4 वर्षाची चिमुकली जागीच ठार; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

Summary

आठवडा बाजार करून व चिमुकलीला शाळेचा ड्रेस घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने आई व पाच वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना मंगळवेढा-उमदी रोडवरील सोड्डी फाट्याजवळ आज दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका विचित्र होता […]

आठवडा बाजार करून व चिमुकलीला शाळेचा ड्रेस घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने
आई व पाच वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना मंगळवेढा-उमदी रोडवरील सोड्डी फाट्याजवळ आज दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे.
हा अपघात इतका विचित्र होता की आईच्या शरीराचे तुकडे पडले आहेत, तर पाच वर्षीय मुलीला जोराचा मार लागल्याने तिचाही मृत्यू झाला आहे.
शांता धनाजी बाबर (वय 25 रा.खवे ता.मंगळवेढा) व त्यांची अनन्या बाबर (वय 4) चिमुकली असे अपघातात मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेची प्राथमिक माहिती अशी की, खवे येथील वडील, मुलगी व नात हे तिघेजण उमदी येथून आठवडी बाजार उरकून घराकडे येत असताना सोड्डी फाट्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातामध्ये दुचाकीस्वार गणपत धोंडीराम भोसले हे जखमी झाले आहेत तर त्यांची मुलगी व नात यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे
घटना समजताच सोड्डी गावचे सरपंच शांतप्पा बिराजदार, पोलीस पाटील चिदानंद पाटील, माजी सभापती सुधाकर मासाळ व ग्रामस्थांनी मदत कार्य केले.
दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर तब्बल दोन तासानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पिसे यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *