रेल्वे इंजिन ने कटून युवकाचा मृत्यू
सावनेर – दिनांक : ५/१२/२०२० आज सायंकाळी ५.३० च्या दरम्यान सावनेर निवासी यश गढवाल वय २१ वर्षे या युवकाचा रेल्वे इंजिन खाली येऊन मृत्यू झाला.
मिळालेल्या माहिती नुसार मृतक कानाला इअर फोन लावून रेल्वे रुळावर बसला होता. रेल्वे इंजिन आल्याचे त्याला कळले नसल्याने सदर अपघात झाला असावा असे जमलेल्या लोकांचे मत आहे.
विजय कांबळे
सावनेर शहर
न्यूज रिपोर्टर