40 लाखाच्या मार्गाचे 04 महिण्यातच तिन-तेरा वाजले भाजप च्या च नेत्यांनी केली चौकशी ची मागणी प्रांकलनाणाची पायमल्ली अधिकारी सुस्त -नेते मस्त – प्रवासी त्रस्त
Summary
कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे -कोंढाळी -नागपूर चारपदरी महामार्गाला जोडणाऱ्या कोंढाळी -दोड़की/धुरखेडा मार्गाची फारच दुरावस्था झाली होती. या कोंढाळी वरून दोडकी- पुसागोंदी तसेच याच मार्गाने धुरखेडा -मासोद गावांना जोडणाऱ्या मार्गावरील दळण वळण पाहता या भागातील भाजप नेते योगेश चाफले, बबलू बिसेन, तर […]
कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे
-कोंढाळी -नागपूर चारपदरी महामार्गाला जोडणाऱ्या कोंढाळी -दोड़की/धुरखेडा मार्गाची फारच दुरावस्था झाली होती. या कोंढाळी वरून दोडकी- पुसागोंदी तसेच याच मार्गाने धुरखेडा -मासोद गावांना जोडणाऱ्या
मार्गावरील दळण वळण पाहता या भागातील भाजप नेते योगेश चाफले, बबलू बिसेन, तर रा का चे स्वप्निल व्यास, जगदीश राठोड, रामचंद्र चव्हाण, पवन पेंदाम, प्रकाश बारंगे,अमोल रेवतकर यांनी या मार्गावरील चारचाकी, दुचाकी, शेतमालवाहू ट्रेकट्रर व पायदळ दळणवळण पाहता व रस्त्याची दुरावस्थे साठी आप आपल्या नेत्यांकडे या मार्गाच्या दुरूस्ती साठी मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे वृत्तपत्रांचे माध्यमातून या सडकेच्या दुरावस्था शासन/प्रशासनाचे नजरेस आणून दिली. काटोल उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत अंदाजे 800मिटर अंतराराचे या मार्गाच्या दुरूस्ती साठी 40लाख रूपये मंजूर करण्यात आले. व मागील तीन -चार महिण्याआधी यामार्गाचे दुरूस्ती बांधकाम ही करण्यात आले.
मात्र चार महिन्याचा कालावधी लोटत नाही की 40लाखाच्या मार्गाचे दुरूस्ती बांधकामाचे तीन- तेरा वाजले व हा मार्ग पुर्णत: उखडल्याची तक्रार खुद भारतीय जनता पार्टी चे काटोल पंचायत समिती चे माजी सभापती व माजी तालुकाध्यक्ष योगेश चाफले तसेच भारतीय युवा मोर्चा चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बब्लु बिसेन यांनी दिली आहे.
या मार्गावरील बांधकामाची प्रत्यक्ष पाहनी वरून या कामासाठी मंजूर 40 लाख रुपयांपैकी 10लाखाचे तरी दुरूस्ती चे बांधकाम झाले काय?
त्याच प्रमाणे या मार्गाचे दुरूस्ती बांधकामांचे वेळी संबंधीत शाखा अभियंता, किंवा उप विभागीय अभियंता यांचे देखरेखीखाली झालेले बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे कसे!अशी विचारणा माजी सभापती योगेश चाफले व भाजप युवा मोर्चा चे बबलु बिसेन यांनी केली असून, या मार्गावरील झाले ल्या बांधकामाचे फक्त चारच महिन्यात तीन -तेरा वाजले असून 40लाखाचे बांधकामाची उच्चस्तरीय गुणवत्ता व दक्षता विभागाचे प्रामाणिक अधिकार्यांकडून चौकशी ची मागणी ही केली आहे.
या बाबतीत या शाखा अभियंता आवळे यांना विचारले असता त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे या 40लाखाच्या मार्गाचे दुरूस्ती बांधकामाचे ठिकाणी पुन्हा खड्डे पडले ते नव्याने पुन्हा दुरूस्ती करण्यात येणार आहे. तसेच अधीक विचारले असता त्यांनी सांगितले की अजून काम अपूर्ण आहे.
या मार्गाचे झलेले कामाची चौकशी साठी विरिष्ठ अधिकारी चौकशी करीतल काय??
सध्या तरी या मार्गावरील वाहतूक करणारे वाहनचालक त्रास -अधिकारी सुस्त -ठेकेदार मस्त अशी म्हण येथे फिट बसत आहे असेही योगेश चाफले व बबलू बिसेन यांनी सांगितले आहे.