रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा उपराजधानी च्या वेशीवर (च्या सीमेत दाखल) दाखल ई डी सरकार ला जागे करण्यासाठी युवासंघर्ष यात्रा रोहित पवार
Summary
कोंढाळी – वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे युवकांच्या उज्वल भविष्यासाठी, महिलांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी,व समृद्ध महाराष्ट्रासाठी,युवा संघर्ष यात्रा ०९डिसेंम्बर चे सकाळी १२-२५वाजता राज्याच्या उपराजधानी व नागपुर जिल्ह्याच्या सीमेवर पांजरा (गो) येथे दाखल होताच ढोल ताशांच्या भव्य निनांदात […]
कोंढाळी – वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
युवकांच्या उज्वल भविष्यासाठी, महिलांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी,व समृद्ध महाराष्ट्रासाठी,युवा संघर्ष यात्रा ०९डिसेंम्बर चे सकाळी १२-२५वाजता राज्याच्या उपराजधानी व नागपुर जिल्ह्याच्या सीमेवर पांजरा (गो) येथे दाखल होताच ढोल ताशांच्या भव्य निनांदात व फटाक्यांच्या भव्य आतिषबाजी करत तसेच टाळ मृदंग वीणा वादन करत भजन मंडळी सोबतच कोंढाली येथील राष्ट्रवादी काँग्रेस कडून रोहित पवार व पदयात्रेतीलमान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा देऊन युवा संघर्ष यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
दुपारी ०१-३०बाजता औद्योगिक ग्राम बाजारगांव येथे प्रवेश होताच ग्रामवाशियांनी गुलाब पुष्प वृष्टी करून तसेच कार्यक्रम स्थळी पोहोचवण्या आधी गुलाबपुष्पांचा भव्यदिव्य हाराने स्वागत केले.
हे सरकार ई डी सरकार आहे
राज्यातील शेतकरी, शेतमजूर,महिला, व्यापारी, कामगार, यांच्या समस्या आ वासून उभ्या असतांना महायुती सरकार राज्यात धर्मा धर्मात, जाती जमाती भांडणे लावून,विरोधी पक्ष संपविण्या साठी ईडी चार उपयोग करून आप आपल्या खुर्च्या वाचविण्यात दंग आहेत.
राज्यातील युवा पिढीला साद घालण्यासाठी, सोबतच महिलांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांचे विकासासाठी , तसेच समृद्ध महाराष्ट्रासाठी, आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष पदयात्रेचे आयोजन केले आहे. पुण्यातील तुळापूर येथून २५ ऑक्टोबर रोजी सुरू झालेली यात्रा ०९ डिसेंबर रोजी राज्याच्या उपराजधानी नागपूर जिल्ह्याचे वेशीवर नागपुर जिल्ह्यात प्रवेश केला.
युवा संघर्ष यात्रा, ‘एकूण ७५० हून अधिक किलोमीटर प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात सुरू आहे. राज्यातील शेतकर्यांच्या शेतमालाला न परवडणारे भाव, बेरोजगारीचा वाढलेला दर, परीक्षा आयोजित करण्यात होणारा दीर्घकाळ विलंब, कायमस्वरूपी पदांऐवजी कंत्राटी नोकऱ्यांचा प्रसार आणि तरुणांच्या समस्यांबाबत युवा वर्गाशी भेटून चर्चा करण्यात आली.
या चर्चे दरम्यान त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आणि इच्छा आहेत त्याबाबत व्यक्त होण्याची संधी त्यांना या यात्रेदरम्यान उघड झाली . तरुणांना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट जनतेशी संवाद आवश्यक असून, ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. तरुणांच्या विविध समस्यांकडे कायमच सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत विधानसभेत महाराष्ट्रातील तरुणांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु सरकार उदासीन असल्याचे पाहायला मिळत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले, ‘सरकारच्या उदासीनते त्यामुळेच पदयात्रेच्या माध्यमातून आता रस्त्यावर उतरलो आहोत.
तरुणांना भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट जनतेशी संवाद साधणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेऊन ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.’
या प्रसंगी या भागातील आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे.. विधानसभेत शेतकर्यांच्या पीकांचे नैसर्गिक आपत्तीच्या काळात चर्चा करायला तयार नाही, २०१३ला माजी मुख्यमंत्री अशोक व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढली होती. तरी ही शेतकर्यांच्या पीकांचे योग्य मोबदला देण्यात येत नाही. खरे तर सरकार ने कापसाला १४हजार तर. सोयाबीन ला०८हजार रू दर देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली.
तसेच निवडणूका पुर्वी राज्यातील कोट्यवधी रुपयांचे उद्योग गुजरात व अन्य राज्यांत जाऊ दिल्याने राज्यात बेरोजगारी वाढ आहे. २०१४चे निवडणुकीत मोदी यांनी वर्षा काठी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होते. मात्र आज बेरोजगारी वाढत आहे.
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा होऊ शकतो
माजी उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ शकतो. सरकार ने आठ ते बारा तास दिवसाला वीज पुरवठा देण्यात कुठली ही अडचण नाही मात्र या सरकारची शेतकरी हिताची मानसिकता नाही असे सांगितले. या बाबतीत विधानसभेतही शेतकरी हिताचे प्रश्न मांडले जाणार असे सांगितले.
मोहिमेचा टप्पा शेवटचा सुरू आहे. या ४२ दिवसांत असून, त्यात १० जिल्हे, २८ तालुके आणि ४६० हून अधिक गावातून ही आतापर्यंत ७५०कि.मि. पेक्षा अधिक आज पर्यंत ची सर्वात मोठी व सर्वात लांबची युवा संघर्ष पदयात्रा असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी बाजारगांव चे सरपंच व सदस्यांसह लगतच्या परिसरात सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व शाखांचे पदाधिकार्यांनी ही पाहूण्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी रोहित (आबा)पाटील, राजू राऊत, वैशाली टालाटूले, सभापती संजय डांगोरे,बंडू उमरकर अनूप खराडे,आरघोडे शैलेंद्र तिवारी निळकंठराव ढोरे,काटोल, नरखेड, नागपूर ग्रामीण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच हजारों च्या संखेत युवावर्ग या युवासंघर्ष पदयात्रेत सहभागी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि प सदस्य सलील देशमुख संचालन राजु कोतेवार तर आभार आकाश गजबे यांनी केले.