भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

“शायनिंग इंडिया” विषय देऊन चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून पारखण्यात आली विद्यार्थ्यांची रचनात्मकता

Summary

प्रतिनिधी पवनी:- आज दिनांक १२ ऑगस्ट २०२३ शनिवारला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेन्द्री बुज येथे प्रातःकाल वुमन वेल्फेअर फाउंडेशन च्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये त्यांना शायनिंग इंडिया हा विषय देऊन विद्यार्थ्यांची भूमिका सुद्धा विचारण्यात […]

प्रतिनिधी पवनी:- आज दिनांक १२ ऑगस्ट २०२३ शनिवारला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेन्द्री बुज येथे प्रातःकाल वुमन वेल्फेअर फाउंडेशन च्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये त्यांना शायनिंग इंडिया हा विषय देऊन विद्यार्थ्यांची भूमिका सुद्धा विचारण्यात आली . शायनिंग इंडिया अर्थात उज्वल भारत, लक्खपणे चकाकणारा स्वयंप्रकाशित उज्वल भारत या देशाला घडवणारे तुम्ही उद्याचे जबाबदार प्रतिष्ठित नागरिक आहात. त्यादृष्टीने तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही शायनिंग इंडिया संदर्भात आपली काय भूमिका बजावणार आहात असा प्रश्न येथील इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विचारण्यात आला. शायनिंग इंडिया चा अर्थ आपला भारत देश इतर देशांवर आर्थिक, बौद्धिक, नैसर्गिक किंवा इतर दृष्ट्या अवलंबून राहणार नाही अर्थात स्वयंप्रकाशित राहणार अशी सुंदर प्रेरणा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा जिल्ह्याचे पवनी तालुका कार्यक्रम समन्वयक अनिल जांभुरे यांनी येथील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात रुजविली. तसेच विद्यार्थ्यांची शायनिंग इंडिया विषयाला धरून असणारी रचनात्मकता चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडारा चे जिल्हा सहायिका मा. कु. प्रणाली वालदे यांच्यामार्फत तपासण्यात आली.
या वेळी खालील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हे स्पर्धा घेण्यात आली.
१) प्रभाकर मेश्राम (मुख्याध्यापक)
२) श्रीपत मरघड़े (उपसरपंच )
३) संजय चोपकर (ग्रामपंचायत सदस्य)
४) प्रणाली वालदे
५) अनिल जांभूरे
शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *