डॉ बाबासाहेबांच्या बैनर ची विटंबना दोशींवर कार्यवाही झालीच नाही
चंद्रपुर:- काल दुर्गापूर सिमराज बार जवळील चिल्लर देशी दारू दुकानाच्या मुत्रीघरा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठया साईज चे बॅनर लावून त्यावर दारू पिणारे लोक लघुशांका करीत असल्याचे आढळून आले. सदर बाब लक्षात येताच वंचित बहुजन आघाडी महानगर व युवा आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरत आठ दिवसात सदर आरोपीवर कारवाही करण्यात यावी असे जिलाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा असे निवेदना द्वारे सूचित करण्यात आले.अन्यथा वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रशासनाला देण्यात आला.
या प्रसंगी महानगर कार्याध्यक्ष मा. सतिश खोब्रागडे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मा. संदीप देव, युवा आघाडी कार्यकारिणी सदस्य मा. अश्विन शेंडे, शहर युवा महासचिव मा. हर्षवर्धन कोठारकार, शहर उपाध्यक्ष मा. सिद्धार्थ गणवीर, मा.कबीर घोनमोडे,चंद्रपूर तालुका अध्यक्ष मा. धर्मेंद्र शेंडे बल्लारपूर जिल्हा युवा आघाडी कार्यकर्ते मा. प्रदीप भाऊ झामरे, मा.गौतम रामटेके, सौ. करिष्मा गौतम रामटेके, मा. महेंद्र नवलकर मा. शुभम दुधे.मा. अभिलाष चुनारकर,मा. अंकित साव, मा. साहिल अलोणे उपस्थित होते.
