दारूसह आता सुगंधी तंबाखूही नकली! इसेन्स-थिनरसारख्या रासायनिक द्रवांचा सर्रास वापर {नकली दारू महागड्या ब्रँडच्या इंग्रजी दारूच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग करून ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे सर्वश्रुत असताना आता खर्ऱ्यासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखूही नकली येत असल्याचे अनेक तक्रारी.} दारूसह आता सुगंधी तंबाखूही नकली! इसेन्स-थिनरसारख्या रासायनिक द्रवांचा सर्रास वापर
Summary
लदारू बंदीच्या जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी चालला खेळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी अवैध दारू विक्री करनार्या पायबंद घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षकांना निवेदन काटोल/कोंढाळी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून काटोल तालुक्यातील कोंढाळी व रिधोरा […]
लदारू बंदीच्या जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी चालला खेळ
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी अवैध दारू विक्री करनार्या पायबंद घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षकांना निवेदन
काटोल/कोंढाळी :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून काटोल तालुक्यातील कोंढाळी व रिधोरा येथील अवैध दारू विक्रीवर काटोलकोंढाळी,चाकडोह जुनापानी येथुन वर्धाजिल्ह्यात होनारी दारू तस्करीवर पायबंद घालण्यासाठी रिधोरा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार व कौन्सिल फॉर ह्युमन राईट चे काटोल - नरखेड तालुका अध्यक्ष दुर्गेश(बबलू)बिसेन यांनी नागपूर जिल्ह्या उत्पादन शुल्क अधिक्षक मनपीया यांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या तीन दशकांपासून दारूबंदी लागू असलेल्या वर्धा जिल्ह्यात नकली दारूच्या पुरवठ्यासोबत आता नकली सुगंधी तंबाखूचाही पुरवठा होत आहे. यामुळे जिल्हावासीयांचे आरोग्य चांगलेच धोक्यात येत आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला निमंत्रण देणारा हा तंबाखू, खर्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्हा वाशीयांचे पोटात जात आहे. विशेषत: युवा वर्गात विषारी तंबाखूयुक्त खर्रा सर्रास खाल्ला जात असल्याने प्रशासनासाठी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे.
दारूबंदी असल्याने वर्धा जिल्ह्यात उपराजधानी नागपुर च्या लगतचे तालुक्यातील गावावरून वर्धा जिल्ह्यात चोरून लपून दारूचीतस्करी होत आहे. अनेक ठिकाणी बिनधास्तपणे देशी-विदेशी दारूची विक्री होते. दारूबंदीचा गैरफायदा घेत नकली दारू महागड्या ब्रँडच्या इंग्रजी दारूच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग करून ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे सर्वश्रुत असताना आता खर्ऱ्यासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखूही नकली येत असल्याचे उघडकीस आले आहे.
. पण या पद्धतीने जिल्ह्याच्या अनेक भागात नकली तंबाखूचे जाळे पसरले असताना कारवाई करण्यासाठी कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.
नकली सुगंधी तंबाखूसाठी थिनरचा वापर
खर्ऱ्यासाठी ‘मजा’ हा सुगंधी तंबाखू सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे रंगकामात वापरल्या जाणाऱ्या थिनर या विषारी रासायनिक द्रवासह इसेन्सचा वापर करून नकली मजा हा तंबाखू बनविला जातो. अनेक लोक दारूसोबत खर्ऱ्याच्या आहारी गेले असल्याने ते कोणताही विचार न करता बिनधास्तपणे हा नकली तंबाखूयुक्त खर्रा खाऊन आजाराला आमंत्रण देतात. विशेष म्हणजे याच पद्धतीने मोहाच्या दारूतही इसेन्स आणि थिनरचा वापर केला जात आहे.
अन्न पुरवठा विभाग पांगळा
नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या प्रत्येक पदार्थाची तपासणी करणारी यंत्रणा शासनाकडे आहे. पण वर्धे सह नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील उत्पादन शुल्क विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अस्तित्व नाममात्र आहे. मंजूर पदांपैकी लागनारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे पांगळ्या झालेल्या या दोन्ही विभागाकडून कारवाईची अपेक्षा कशी करणार, हा प्रश्न आहे. पोलीस विभाग कधी कळी कुणाच्या तक्रारी आल्याच तर कर्यवाही करतांना दिसतात तरी यावर नियंत्रण बसत नाही हे विषेश!!!!

