BREAKING NEWS:
महाराष्ट्र

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू

Summary

नागपूर दि. 02 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा […]

नागपूर दि. 02 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.

महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *