BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Summary

मुंबई, दि. 6 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी प्रणालीवरुन नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती दिनांक २२ सप्टेंबर, २०२२  पासून सुरु झालेली आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन […]

मुंबई, दि. 6 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी प्रणालीवरुन नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती दिनांक २२ सप्टेंबर, २०२२  पासून सुरु झालेली आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर करावेत. दरवर्षी प्रमाणे नोंदणीकृत झालेल्या अर्जापैकी नूतनीकरण अर्जाचे प्रमाण नविन अर्जाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपले स्तरावरील नुतनीकरणाचे अर्ज प्रथम प्राधान्याने पडताळणी करुन ऑनलाईन मंजूर करुन संबधित सहायक आयुकत, समाज कल्याण, ( मुंबई शहर/उपनगर) यांचे लॉगीनकरिता तात्काळ पाठवावेत. तसेच महाविद्यालयांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाही, यांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन मुंबई उपनगर आणि मुंबई शहरचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *