हेडलाइन

zpfms प्रणाली अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांची मासिक पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँक खात्यावर जमा करावी

Summary

प्रेसनोट zpfms प्रणाली अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांची मासिक पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँक खात्यावर जमा करावी__ प्रहार शिक्षक संघटना शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या 5 मे 2022 च्या पत्राच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी […]

प्रेसनोट

zpfms प्रणाली अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांची मासिक पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँक खात्यावर जमा करावी__ प्रहार शिक्षक संघटना शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या 5 मे 2022 च्या पत्राच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तात्काळ कार्यवाही करून चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे मे 2022 चे वेतन थेट शिक्षकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेत. एवढ्या कमी कालावधीत 5 हजार शिक्षकांच्या थेट बँक खात्यावर वेतन जमा केल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले असून ज्या प्रमाणे आपण तात्काळ शिक्षकांच्या थेट बँकेत मासिक वेतन जमा केलेत त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परीषद मधील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. एकतर सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कोणत्याही प्रकारच्या कपाती पंचायत समिती स्तरावर नसतात. सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 60 टक्के वेतन व त्यावरील महागाई भत्ता मिळत असतो. जिल्हा परिषद स्तरावरून पंचायत समितीला अनुदान उपलब्ध होऊन सुध्दा अनेकदा आठ दहा दिवस सेवानिवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन बँकेत उशीराने जमा होते.सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांचे सेवानिवृत्त वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँक खात्यावर जमा झाल्यास पंचायत समिती स्तरावरील वेळेत बचत होनार आहे. जिल्हा कोषागार कार्यालया तून सेवानिवृत्त झालेले शासकीय कर्मचारी , अधिकारी व खाजगी माध्यमिक व प्राथमिक शिक्षक यांची सेवानिवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँक खात्यावर जमा होत आहे.त्यामुळे त्यांना मासिक पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन दरमहा 30 तारखेच्या आत मिळत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदला रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्याच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक आपल्या कार्यावर आनंदित आहेत.सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतन घेणारे कर्मचारी यांचे वारसान यांचे ऑगस्ट 2022 चे सेवानिवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश व्हावे यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी निवेदना द्वारे कार्यवाही जुलै महिन्यांपासून सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून एन.एस.सी.कडून बँक खात्याची पडताळणी होऊन ऑगस्ट 2022 पासून सेवानिवृत्त वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन थेट बँकेत जमा होऊ शकतात. विनोद लांडगे जिल्हा सरचिटणीस, देवेंद्र रायपूरे, जिल्हा कार्याध्यक्ष , अमोल खोब्रागडे, होमेंद्र मेश्राम, मुन्ना येरणे, दिनेश कवाडे, देवानंद तूलकाने , जयगुरू मेश्राम, योगेश रामटेके यांनी संघटनेचा पत्रका द्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *