अमरावतीचे आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांनी धार्मिक भावना भडकवण्याचे काम गेल्या आठवडया भरा पासून सुरू होते

अमरावतीचे आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांनी धार्मिक भावना भडकवण्याचे काम गेल्या आठवडया भरा पासून सुरू होता त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याची जिद पकडली जर त्यांना हनुमान चालीसा घठन करायचे होते तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उच्दव ठाकरे साहेब यांना विनंती केली असती तर त्यांना माताश्री वर हनुमान चालीसा पठन करू दिले असते पण त्यांना महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचे होते समाजात तेढ निर्माण करायचे होते व त्यांनी केले व पक्षप्रमुखांना अपशब्द वापरल्यामुळे शिवसैनीकांची भावना दुखावली गेली आहे. यामुळे आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात नागपूर महानगर प्रमुख श्री किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात संविधान चौक, नागपूर येथे आंदोलन करण्यात आले व आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांचावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी केली. या वेळेस अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्वश्री चंद्रहास राऊत, दिपक कापसे, सुरज गोजे, प्रविण बर्डे, किशोर ठाकरे, राजेश कनोजीया, सुनिल बॅनर्जी, शंकर बेलखोडे, पुरुषोत्तम बन, राजेश गुजर, राजेश शिर्के, रमेश,मोरे,मनोज साहू, महेन्द्र कठाने,रमेश पवार,दीपक पौनीकर, नीलेश तिघरे, अनुराग लारोकर उपस्तित होते.