वंचित बहुजन आघाडी व्दारे भारतीय विध्यार्थी दिवस थाटात साजरा
कन्हान : – गहुहिवरा चौक कन्हान येथे वंचित बहुज न आघाडी शाखा कन्हान व्दारे भारतीय विध्यार्थी दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
रविवार (दि.७) नोव्हेंबर २०२१ ला वंचित बहुजन आघाडी व्दारे गहुहिवरा चौक कन्हान येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्प ण व अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी कन्हा न शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी विशेष मार्गदर्शना त महामानव भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विध्या र्थी जीवनातील संघर्षा वर प्रकाश टाकुन (दि.७) नोव्हें बर दिवस हा त्यावेळी वंचित, पिडित, शोषितांकरिता उदयास आलेल्या प्रकाशमय दिवसामुळं वंचित समा जाला आज शिक्षण, सामाजिक न्याय, बंधुता, समता, मौलिक हक्क, अधिकार, देशाला संविधान पर्यंतचा प्रवास याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी प्रामुख्याने रामटेक विधानसभा उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संकल्प कर ण्यात आला की सामाजिक शैक्षणिक न्यायाकरिता वंचित बहुजन आघाडी विध्यार्थी मित्रा सोबत नेहमी खंभीर उभे राहुन कार्य करणार. कार्यक्रमाचे सुत्रसंचा लन आभार महासचिव कन्हान शहर प्रवक्ता रजनीश (बाळा) वामन मेश्राम यांनी व्यकत केले. यशस्विते करिता कन्हान शहर उपाध्यक्ष शैलेश भाऊ ढोके, विकास साहारे, अमोल साहारे, मंगेश रंगारी, अरूण टेभुर्णिकर, जतीन गजभिये, भोला राणे, सतीश ढबाले सह कार्यकर्त्यानी सहकार्य केले.

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535
जाहिरातीकरीता सम्पर्क साधा
