पुणे महाराष्ट्र हेडलाइन

भर पावसात लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूटमार्च

Summary

पत्रकार – सागर घोडके पुणे (मावळ) पवनानगर – लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावात सार्वजनिक व कौटुंबिक गणपती बाप्पा चे विराजमान झाले आहे. गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या […]

पत्रकार – सागर घोडके
पुणे (मावळ)

पवनानगर – लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावात सार्वजनिक व कौटुंबिक गणपती बाप्पा चे विराजमान झाले आहे. गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतिने भर पावसात मौजे कुसगाव बुद्रुक , कार्ला व पवनानगर या गावात रूटमार्च घेण्यात आला.
या वेळी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी गणेश मंडळे , ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना गणेश विसर्जनाच्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विसर्जन मिरवणूक काढणार नाही. तसेच विसर्जन घाटावर कोणीही गर्दी करणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
तसेच ट्रक्टर मधुन घरोघरी गणेश मूर्ती , गौरी गणपती एकत्र गोळा करून विसर्जन ठिकाणी पोहचवावेत या बाबत ग्रामपंचायत सदस्य, सरपंच , पोलीस पाटील यांना अहवान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *