युवासेना कन्हान व्दारे नारायण राणे चा निषेध
कन्हान : – राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेबा बद्दल नारायण राणे यानी अपशब्द वापरल्या बद्दल युवासेना कन्हान व्दारे निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेबा बद्दल नारायण राणे यानी अपशब्द वापरल्या बद्दल युवासेना कन्हान व्दारे कन्हान नदी काठावर घोषणाबाजी करून नारायण राणे यांचा प्रखर निषेध व्यकत करण्यात आला. याप्रसंगी युवासेना रामटेक लोकसभा समन्वयक लखन यादव, रामटेक विधानस भा चिटणीस लोकेश बावनकर, कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम , सुनिल यादव, ओजस कुंभलकर, अनिल लोंढे, आकाश ठाकरे, कार्तिक पिल्ले, अंकुश बचले, रितिक कापसे सह अन्य युवासेना कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535