पालकमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी बीएनसी पॉवरतर्फे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्द
नागपूर ता. 21 : बीएनसी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीतर्फे पालकमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
बीएनसी पॉवर कंपनीचे अधिकारी गिरीश चौधरी यांनी हा धनादेश डॉ. राऊत यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केला. सांघिक सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत हा निधी देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नासुप्रचे सभापती मनोज सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.