BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सिंगारदिप रेती घाट बंद करण्यासाठी गावक-यांचे आंदोलन रेतीच्या वाहतुकीने गावाचा एकमेव रस्ता, पिण्याची पाईप, शाळकरी विद्यार्थाना धोका.

Summary

नागपूर कन्हान : – सिंगारदिप गाव हे कन्हान नदीला आलेल्या महापुराने आदीच भयंकर नुकसान झाले असताना जिल्हाधिकारी हयानी सिंगारदिप रेती घाट लिलाव करून सुरू केल्याने रेतीची वाहतुक ट्रक्टर, ट्रकने घाटधारक करित असल्याने गावाचा एकमेव डाबरी रस्ता, पिण्याची पाईप लाईन, प्रदुषण, […]

नागपूर कन्हान : – सिंगारदिप गाव हे कन्हान नदीला आलेल्या महापुराने आदीच भयंकर नुकसान झाले असताना जिल्हाधिकारी हयानी सिंगारदिप रेती घाट लिलाव करून सुरू केल्याने रेतीची वाहतुक ट्रक्टर, ट्रकने घाटधारक करित असल्याने गावाचा एकमेव डाबरी रस्ता, पिण्याची पाईप लाईन, प्रदुषण, शाळकरी मुले व गावक-यांना धोका निर्माण झाल्याने गावक-यांनी हा रेतीघाट बंद करण्याकरिता शनिवार पासुन आंदोलन सुरू केले आहे.
कन्हान- तारसा रोड वरून दक्षिणेस ३ कि.मी लांब कन्हान नदी काठावर बसलेल्या सिंगारदिप गावा ला एकमेव डाबरी रस्ता असुन दि. २९ व ३० ऑगस्ट ला पेंच धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने महापुर आल्या ने गावाचा २ कि.मी.परिसर पाण्याने व्यापुन गावाचा संपर्क तुटला होता. या महापुराने गावाचे व गावक-यां चे भयंकर नुकसान झाले होते. आपातकालीन सकंटा तुन गावाचे पुर्वसन करण्याचे सोडुन मा जिल्हाधिकारी मार्फत सिंगारदिप रेती घाटाचा लिलाव करून सुरू करण्यात आल्याने रेतीघाट धारका व्दारे ट्रक्टर, ट्रकने नदीतुन रेती वाहतुक सुरू केल्याने गावाचा एकमेव डाबरीरस्ता, पिण्याची पाईप लाईन, शाळकरी विद्यार्थी व गावक-याना धोका निर्माण झाला तसेच प्रदुषणाने आरोग्यास सुध्दा अपायकारक होऊ शकतो या करिता हा रेती घाट रद्द करून बंद करण्यात यावा म्हणुन गाव क-यानी रस्त्यावर बैलबंडी आडवी लावुन रस्त्यावर बसुन शनिवार (दि.२०) पासुन आंदोलन सुरू केले आहे.
सोमवार (दि.२२) ला सिंगारदिप आंदोलन स्थळी स्थानिय आमदार आशिष जैस्वाल हयानी भेट देऊन संबधित अधिका-यांना फोन वर बोलुन रेती घाटास गावास व गावक-यास धोका निर्माण होत असेल, गाव क-यांचा विरोध असेल तर हा रेती घाट रद्द करण्यात यावा. याविषयी मी पत्र सुध्दा देतो म्हणुन ग्रामस्थाना आश्वस्त केले.
प्रहार जनशक्ती जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे हयानी सिंगारदिप गावक-यांचे हितार्थ हा रेती घाट त्वरित बंद करण्यात यावा. तहसिलदार व पोलीस निरिक्षक गावक-यांचे संरक्षण करण्याचे सोडुन घाटधारकांची बाजु घेऊन धमकावित असेल तर लोकशाही च्या मार्गाने तहसिल कार्यालयात पाचसे लोकांसह धरणे करून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सिंगारदिप गावाचे व गावक-यांचे हित जोपास ण्याकरिता सिंगारदिप रेती घाट त्वरित रद्द करून बंद करण्याची मागणी ग्राम पंतायंत बोरी (सिंगारदिप) उपसरपंचा शुंभागी टोहणे, ग्रा प सदस्य अनिल कुथे, पुरूषोत्तम ईखार, उषा दोडके, माजी उपसरपच अशोक टोहणे, पाडुरंग मोहोड नानेश्वर दोडके, ृराजेश सावरकर, विष्णु कुथे, पाडुरंग दोडके, क्रिष्णा कुथे, दिपक टोहणे, रविंद्र कुथे, बिसन भुरे, राधेश्याम दोडके, पुरूषोत्तम दोडके, अकुंश भुरे, बाबा अवझे, हिरामण दोडके, महादेव कुथे, गुंडेराव दोडके, गोविंदा टोहणे, संगिता दोडके, सविता दोडके,भाग्यश्री टोहणे, जयश्री दोडके, माया दोडके, मंगला दोडके, शालु दोडके, वनिता दोडके, अनिता दोडके, छाया अवझे, प्रियंका दोडके, दुर्गा अवझे, रूखमा दोडके, सेजल अवझे, दुर्गा दोडके, पुर्वा अवझे, समिक्षा दोडके सह गावक-यांनी धरणे आंदोलन करून रेती वाहतुक बंद केली.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *