सरकारी वृत्त सेवा ‘ऑल इंडिया रेडियो’ च्या बातमीमुळे राजनच्या मृत्यूबाबत गैरमाहिती?
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8.मे.2021
छोटा राजनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. हि बातमी ऑल इंडिया रेडियो या सरकारी वृत्त सेवेने दिली होती. छोटा राजन अद्याप जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे AIIMSचे जनसंपर्क अधिकारी बी. एन. आचार्य यांनी माहिती दिली आहे. छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरम्यान ही बातमी खोटी असून, त्याच्यावर अजून उपचार सुरू आहेत असे एम्स रुग्णालयाने म्हटले आहे.