महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Summary

मुंबई, दि. 30 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरिता बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई […]

मुंबई, दि. 30 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरिता बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तीनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *