लायन्स क्लब गडचिरोली द्वारा आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर.
प्रा.शेषराव येलेकर
जिल्हा प्रतिनिधि
गडचिरोली
नुकतीच लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने कोविड-19 जनजागृती च्या निमित्ताने, दिनांक 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन चित्रकला स्पर्धा तीन गटात आयोजित केली होती. गट क्रमांक 1 ,( वर्ग 1 ते 5) विषय: कोरोना पासून संरक्षण, गट क्रमांक 2 (वर्ग 6 ते 8) विषय: कोरोना योद्धा, गट क्रमांक 3 ( वर्ग 9 ते 12) विषय: कोरोणा आणि दैनंदिन जीवन, अशी विभागण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास 500 स्पर्धकांनी भाग घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून गटानुसार विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे आहेत.
गट क्रमांक 1
1) प्रथम क्रमांक: अवनीश रवी शास्त्रकार.
2) द्वितीय क्रमांक: अन्वयी अभिषेख सुरनकर.
3) तृतीय क्रमांक: मधुजा प्रशांत वाघरे.
गट क्रमांक 2
1) प्रथम क्रमांक : वंश मनोज बोमनवार
2) द्वितीय क्रमांक: शौर्या संजय घोटेकर
3) तृतीय क्रमांक: पूर्वा शरद कुमार पाटील
गट क्रमांक 3
1) प्रथम क्रमांक: केतकी विनोद खोब्रागडे
2) द्वितीय क्रमांक: दर्शन राजेश वंजारी
3) तृतीय क्रमांक: मोहित जयप्रकाश बरीये
सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे लायन्स क्लब गडचिरोली तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व सहकार्याबद्दल त्यांचे आभार
सूचना: 1) गडचिरोली शहरात सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव व जनता कर्फ्यू बघता बक्षीस वितरण कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे तशी सूचना विद्यार्थ्यांना मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.
2) स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने सहभाग प्रमाणपत्र त्यांच्या व्हाट्सअप वर पाठविण्यात येईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
आपला
सतीश पवार
सचिव
लायन्स क्लब गडचिरोली