लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदान वर रंगले डॉज बाल चे सामने डॉजबॉल स्पर्धेत मुलींमध्ये के डि एम हायस्कूल व प्रहार मिलिटरी हायस्कूल ला विजेतेपद
Summary
वार्ताहर-कोंढाळी क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष२०२२-२०२३ चे जिल्हास्तरीय डॉज बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर गुरुवार १७-नव्हेंम्बर ला उद्घाटक कनिष्ठ […]

वार्ताहर-कोंढाळी
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष२०२२-२०२३ चे जिल्हास्तरीय डॉज बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर गुरुवार १७-नव्हेंम्बर ला उद्घाटक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश राव शेंम्बकर, प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक शालीनी इंगळे, ज्येष्ठ नागरिक दुर्गाप्रसाद पांडे, पर्यवेक्षक सुधीर बुटे, डॉ निरंजन अंजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटित झाला.
१७व१८नव्हेंबर या दोन दिवसीय जिल्हास्तरीय डॉज बाल स्पर्धेत जिल्ह्यातील शहरी(म न पा)११व ग्रामीण भागातील ११चमूंनी भाग घेतला. यात शहरी (म न पा)भागातील अंडर १९मधे के डी एम हायस्कूल नागपूर व अंडर १७मधे प्रहार मिलिट्री हायस्कूल नागपूर या दोन्ही मुलीच्या संघानी जेते पद पटकावले. या सामन्यात क्रीडा प्रशिक्षक हरिष राठी, उज्वल मोटघरे, ज्ञानेश्वर भक्ते, भूषण राचेलवार यांनी परिश्रम घेतले तर सोहेल पठाण व लिनेश भस्मे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
तर नागपूर ग्रामीण भागातील डॉज बाल संघाचे सामने १८नव्हेंबर रोजी लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार अशी माहिती पर्यवेक्षक सुधीर बुटे यांनी दिली आहे.