राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा निषेध – डॉ. बबनराव तायवाडे
Summary
नागपूर प्रतिनिधी:- दिनांक ३०डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषणा पत्र जारी करून स्पर्धा परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे याबाबत निर्णय जाहीर केला असून त्यानुसार आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल […]
नागपूर प्रतिनिधी:- दिनांक ३०डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषणा पत्र जारी करून स्पर्धा परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे याबाबत निर्णय जाहीर केला असून त्यानुसार आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा निश्चित करताना असे नमूद केले आहे की.
१) अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधी मर्यादा लागू राहणार नाही.
२) ओबीसी प्रवर्गातील(OBC, VJ, NT,&SBC) उमेदवारास कमाल ९ ( नऊ) संधी उपलब्ध राहतील.
ज्याप्रमाणे अनुसूचित जमातीस घटनेच्या ३४२ कलमाप्रमाणे व अनुसूचित जातीस घटनेच्या ३४१ कलमाप्रमाणे आरक्षण सोयी व सवलती देण्यात आलेल्या आहेत त्याच प्रमाणे ओबीसी (OBC, VJ,NT&SBC) प्रवर्गातील उमेदवारांना घटनेच्या ३४० कलमानुसार आरक्षण देण्यात आलेले आहे.घटनेच्या तरतुदीनुसार आरक्षण दिलेले असताना भेदभाव करणे उचित नाही त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील (OBC, VJ, NT,&SBC) उमेदवार यांच्यामध्ये भेदभाव करणारा व दुफळी निर्माण करणारा आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करून ज्याप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना कमाल संधी मर्यादा लागू राहणार नाही त्याच प्रमाणे प्रवर्गातील ओबीसी प्रवर्गातील (OBC, VJ, NT& SBC) उमेदवारांना सुद्धा कमाल संधी मर्यादा लागू राहणार नाही अशी घोषणा त्वरित करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल व या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राहील असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राजनीतिक समन्वयक डॉ. खुशालचंद्र बोपचे, महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, प्रा. शेषराव येलेकर, प्रा. शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, सुषमा भाड, अॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, मनोज चव्हाण,दिनेश चोखारे,विजय पिदूरकर , बबनराव फंड, बबनराव वानखेडे,शकील पटेल, श्याम लेडे, वृंदा ठाकरे, ईश्वर ढोले, सुरेंद्र मोरे, नंदा देशमुख, नाना सातपुते, राजू मोहोड, आशिष तायवाडे, रोशन कुंभलकर, निलेश कोढे, उज्वला महल्ले, सोनिया वैद्य, विनोद हजारे, शुभम वाघमारे, मयूर वाघ, दादाराव चुधरी, प्रा. देवानंद कामडी, विनायक बांदुरकर, पांडुरंग घोटेकर,सुरेश भांडेकर इत्त्यादी पदाधीकारांनी केलेले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर