महाराष्ट्र हेडलाइन

*राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खा.शरदरावजी पवार पश्चिम बंगाल ला प्रचारासाठी जाणार*

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे मैदानात उतरणार आहेत.शरद पवारसाहेब हे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालला जाणार आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे मैदानात उतरणार आहेत.शरद पवारसाहेब हे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालला जाणार आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब येत्या १ एप्रिल पासून पश्चिम बंगालचा तीन दिवसीय दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.*
*तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ शरद पवार हे त्यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होणार आहेत.राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाचा ममता दीदी सक्षमपणे सामना करत आहेत,यात त्यांचे हात बळकट करण्यासाठी मा. शरद पवारसाहेब पश्चिम बंगाल येथे जाणार असल्याचे महेश तपासे यांनी माध्यमांना सांगितले.

राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *