राजकीय पक्षाने जिल्हा पातळीवर आपलं स्वतःच हॉस्पिटल उभं करावं…
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210214-WA0008-5-9.jpg)
मुंबई/ प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ११ एप्रिल २०२१
ज्यांचं संपुर्ण आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेलं त्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी आणि त्याच्या नातलगासाठी जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि गरजेच्या वेळी किमान एखादा बेड आणि आरोग्य सेवा तरी मिळेल. जसे पक्षाचे कार्यालय आवर्जून उभारण्यात यावे. तसेच पक्षाचे हॉस्पिटल जरूर बांधावे. शिवसेना हॉस्पिटल ,राष्ट्रवादी हॉस्पिटल काँग्रेस हॉस्पिटल
भाजप हॉस्पिटल , मनसे हॉस्पिटल शेकाप हॉस्पिटल , आर पी आय हॉस्पिटलवंचित बहुजन हॉस्पिटल एमआयएम हॉस्पिटल, ,बसपा हॉस्पीटल असे ज्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात असे अद्यावत सुविधांनी सुसज्ज सर्व पक्षांचे हॉस्पिटल त्यांच्या कार्यकर्त्यांना व गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध करुन देतील तो दिवस भारतीय राजकारणातील सुवर्ण दिवस असेल”