युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते खंडेलवाल हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटर चे उदघाटन संपन्न
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.5, जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करीत आहेत. आपल्याकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. सद्याची परिस्थिती पाहता गोर गरिबांना सवलतीत उपचार देण्याची भूमिका डॉक्टर्स व हॉस्पिटलने ठेवली पाहिजे असे मत युवानेते अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
सोमवार ( दि.5 ) रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत डॉ. अक्षय खंडेलवाल यांच्या नव्याने सुरू झालेल्या खंडेलवाल हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटरचे उदघाटन युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते पार पडले. यावेळी अब्दुल समीर यांनी वरील मत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई निकम , कैलास खंडेलवाल, विकास खंडेलवाल , डॉ. अक्षय खंडेलवाल आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. समीर म्हणाले की डॉ. खंडेलवाल यांनी सिल्लोड शहरात आपले हॉस्पिटल सुरू केले. येथे आय.सी.यु. ची व्यवस्था असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी चांगली सुविधा यानिमित्ताने मिळणार आहे. कोरोना संकटात सिल्लोडच्या डॉक्टरांचे मोठे योगदान राहिले आहेत अशा शब्दांत सिल्लोडच्या डॉक्टरांनी केलेल्या रुग्ण सेवेचे श्री. समीर यांनी कौतुक केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी घेवून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी नागरिकांना केले.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड