मुख्याध्यापिका प्रमिला नागपुरे यांच्या सेवा निवृत्तीने भावपुर्ण निरोप.
कन्हान : – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांद्री (कन्हान) येथील विषय शिक्षिका व मुख्याध्यापिका प्रमिला नागपुरे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल शाळेव्दारे सत्कार करून समारंभासह भावपुर्ण निरोप देण्यात आला.
पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत जि प उच्च प्राथमिक शाळा कांद्री (कन्हान) व्दारे ग्राम पंचायत कांद्रीचे सरपंच श्री बळवंत पडोळे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी श्री बिरनवार सर , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ तुळसा नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेच्या विषय शिक्षिका व मुख्याध्यापिका प्रमिला नागपुरे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून भावपुर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या वर्षाताई खडसे, सुमनबाई कनोजे, मेश्राम ताई, डोरले ताई, राजकुमारी धुर्वे, प्रफुल निनावे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचा लन व आभार सौ जयश्री निनावे हयानी केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535