BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

माहिती अधिकार कायद्याची ची अवमानना. मिळाली केराची टोपली. चिकना ग्रामपंचायत कार्यालय, पं. स. लाखांदूर चा भोंगळवाना शून्य कारभार. दिड महिना लोटुनही माहिती संबंधाने पत्र नाहीच नाही माहिती देखील मिळाली नाही. जिज्ञासू नागरिक माहितीच्या अधिकारा पासून वंचित

Summary

बारव्हा:- लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिकना ग्रामपंचायत येथील आवश्यक ति माहिती मिळावी म्हणून लाखांदूर पंचायत समिती जनमाहिती अधिकारी यांना दिड महिन्यापुर्वी माहिती अधिकारातून आवश्यक ती माहिती मागविण्यात आली होती, मात्र अर्जदारास दिड महिन्याच्या कालावधी लोटुनही माहिती देण्यात न […]

बारव्हा:- लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिकना ग्रामपंचायत येथील आवश्यक ति माहिती मिळावी म्हणून लाखांदूर पंचायत समिती जनमाहिती अधिकारी यांना दिड महिन्यापुर्वी माहिती अधिकारातून आवश्यक ती माहिती मागविण्यात आली होती, मात्र अर्जदारास दिड महिन्याच्या कालावधी लोटुनही माहिती देण्यात न आल्याने जनमाहिती अधिकारीच ग्रा. पं. चिकना येथील भ्रष्टाचाराला पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.
      मौजा चिकना येथील रहिवासी नामे, गणेश भगवान सोनपिंपळे यांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२३ रोजी लाखांदूर येथील पंचायत समिती जनमाहिती अधिकारी यांच्याकडे चिकना ग्रामपंचायत येथील माहिती अधिकारातून माहिती मागितली होती,
यात सन ०१ एप्रिल २०२० ते ०५ डिसेंबर २०२३ पर्यंतचे मौजा चिकना ग्रामपंचायत येथील मालमत्ता क्रमांक ६४/१ चे नोंदवही देण्यात यावी, सन ०१-०१-२०२३ ते ०५-१२-२०२३ पर्यंतचे मासिक सभा व ग्रामसभा ठराव देण्यात यावे. सन ०१-०४-२०२३ ते ०५-१२-२०२३ पर्यंतचे मालमत्ता क्रमांक ६४/१ , ६४ नमुना गाव आठ देण्यात यावे. दिनांक ०५-१०-२०२३ रोजी चिकना ग्रामपंचायत येथे विनंती अर्ज दाखल करण्यात त्या अर्जावर पंचकमेटी ने काय निर्णय घेतला त्याचा तपशील देण्यात यावा. अशा प्रकारे जनमाहिती अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांना माहिती अधिकारातून माहिती मागविण्यात आली मात्र दिड महिन्यांचा कालावधी लोटुनही माहिती देण्यात आली नाही. प्रस्तुत दीड महिन्याच्या कालावधी मध्ये गणेश सोनपिंपळे यांनी चिकना ग्रामपंचायत च्या पन्नास वेळा चकरा मारल्या तरी ग्रामसेवक भेटले नाही. तसेच चिकना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे माहिती अधिकार कार्यकर्ता गणेश सोनपिंपळे यांचे फोन देखील रिसिव्ह करीत नाही. संबंधित माहिती अधिकारातून माहिती हि अर्जदाराला एक महिण्यात देणे बंधनकारक असुन सुद्धा दिड महिन्यांचा कालावधी झाल्याने संबंधित जनमाहिती अधिकारी  यांनी त्या अर्जाला केराची टोपली दाखल्याचे यावरून दिसून येत आहे.
जनमाहिती अधिकार् यांकडून माहिती न मिळाल्यामुळे अर्जदाराने जोडपत्र “ब” दिनांक ०८-०१-२०२४ ला प्रथम अपिलीय अधिकारी यांचे कडे अपील दाखल केला असून आजपर्यंत अर्जदारासोबत कोनतेच पत्र व्यवहार करण्यात आले नाही. यावरून असे सिद्ध होते कि, चिकना येथील ग्रामसेवक व पदाधिकारी यांना पंचायत समिती मधुनच पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
माहिती न मिळाल्यास राज्य माहिती आयुक्त नागपूर यांच्याकडे दाद  मागविण्यात येईल.
असेही यावेळी अपीलर्थिंनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *