*महाशिवरात्री पिपरी च्या शिवभक्तानी केली साजरी*
*नागपूर* कन्हान : – पिपरी प्रभाग क्रं ६ येथील पौराणिक शिव मंदीरात कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित शिव पुजा अर्चना सह महाशिवरात्री पिपरी च्या शिव भक्त नागरिकांनी साजरी केली.
कन्हान नदीकाठावरील पिपरी प्रभाग क्रं ६ येथे पौराणिक शिव मंदीरात दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमीत्य शिव मंदीरातील मुर्तीस्वरूप शिवज्योतिर्लिंंग पिंडाची विधिवत पुजन जेष्ठ नागरिक क्रिष्णाजी मसा र, धनराज भोयर, चिरकुट रामगुंडे, बलीराम पहाडे ह्या च्या हस्ते पुष्पगुच्छ, पुष्पहार अर्पण करून पुजन केले. पिपरी येथील भजन गाणाऱ्या मंडळींनी महाशिवरात्री पर्वावर भजन गायन करून आरती करीत रवाप्रसाद (कढई), बुंदी, आलुभात, कढी अल्पोहार प्रसाद वाटप करून महाशिवरात्री कार्यक्रम अल्पवेळात समारोप करण्यात आला. कार्यक्रमास शिवशंकर भोयर, प्रशांत बाजीराव मसार, क्रिष्णा गांवडे, मनोहर कुवामनोरे, प्रल्हाद पहाडे, दिलीप रामगुंडे, कार्तिक कुथे, देवा मेश्राम, सुधाकर मसराम, चंद्रभान चौधरी, अजाबराव कड नायके, मोरेश्वर तिडके, धनराज उरकुडे, रामु कावळे, अभिषेक आकरे, संजय गुडधे, मुन्ना नान्हे, संदीप भोस्कर, शुभम खांडेकर, शुभम मरसकोल्हे, क्रिश वानखेडे आदीं शिवभक्तांनी अथक परीश्रम घेतले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147